(सोशल मीडियातून सर्व कार्यकर्त्यांची नानांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा)
पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आ.भारत(नाना) भालके यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून उपचारासाठी मुंबईला रवाना झाले असल्याचे समजत आहे.
काही दिवसांपूर्वीच आमदार भारत(नाना) भालके यांचे सुपुत्र भगीरथ(दादा) भालके हे सुद्धा पॉझिटिव्ह आले होते.
तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक ,वर्क्स मॅनेजर , कार्यालयीन सचिव यांच्यासह जवळपास 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.
गेल्या काही दिवसांत आ.भारत(नाना)भालके यांचा कामानिमित्त सतत मुंबई , सोलापूर,पुणे दौरे होत असत या दरम्यान भालके यांचा संपर्क आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.
खबरदारी म्हणून त्यांनी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.