स्व.हरिश्चंद्र फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री दत्तात्रय पांढरे समाजरत्न म्हणून सन्मानित





वृत्तसंस्था // प्रतिनिधी

स्व.हरिश्चंद्र फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे व्यक्तींना व संस्थांना सन्मानित करण्यात आले. 


 पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दत्तात्रय पांढरे यांना राष्ट्रीय स्नेहबंध समाजरत्न सन्मान घोषित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळुज येथे मागील दोन वर्षापासून व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलत विविध उपक्रमांचे आयोजन करत श्री दत्तात्रय पांढरे यांनी शाळेसाठी मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी जमा केली. तसेच शाळेच्या विविध भौतिक व शैक्षणिक समस्या जाणून घेऊन त्या विविध मार्गांनी व अथक प्रयत्न करून सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. तसेच पुळुज येथील अहिल्याबाई होळकर मित्र मंडळाच्या खजिनदार पदाची जबाबदारी काही काळ त्यांनी यथार्थपणे सांभाळली आहे. त्याचबरोबर कोरोना काळात गरजवंताला धान्य वाटप, मास्क व सॅनिटायझरचे वाटप त्यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्य वाटप केले. रक्तदान शिबिर आयोजित करून स्वतः रक्तदान करून इतरांना प्रेरणा देत रक्तदान करण्यास प्रवृत्त केले. असे विविध सामाजिक कार्य केल्याबद्दल त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली. दत्तात्रय पांढरे यांच्या विविधांगी सामाजिक कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget