पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू - भगिनी, विवीध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, माझे सर्व सहकारी मित्र आपणास कळविण्यास जरा अवघड वाटतं पण पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या वाट्याला कधीना कधी हा दिवस येतच असतो हे आपणा सर्वांना माहीतच आहे. गेली तीन वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचा विस्तारक म्हणून पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष विस्ताराचे काम करत होतो परंतु विस्तारक योजनेचा कार्यकाळ संपल्याने पार्टीच्या आदेशाने पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी आपला कार्यकाळ संपल्यानंतर आपापल्या मूळ कार्यक्षेत्रात जावे असा असल्याने मी विस्तारक या जबाबदारीतुन मुक्त होऊन माझ्या मूळ कार्यक्षेत्रात म्हणजेच मोहोळ येथे जात आहे। हा निर्णय झाल्यापासून जास्तीत जास्त गाठी-भेटी, संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण आपणा सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने या माध्यमातून आपणपर्यंत पोहोचत आहे. याठिकाणी काम करत असताना आपणासोबतच येथील सर्व सामाजिक, शैक्षणिक संस्था, मंडळे, राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू-भगिनी यांचा स्नेह, सहकार्य, भक्कम आधार, जेष्ठांचे मोलाचे मार्गदर्शन, आशीर्वाद, पद, प्रतिष्ठेचा अहंकार बाजूला ठेवून माणूस म्हणून झालेली मैत्री, जोडली गेलेली आपुलकीची नाती यामुळे पंढरपूर- मंगळवेढा कधी माझं घर बनलं हे मला कळलंही नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये आपण मिळून साजरे केलेले सर्व सण, उत्सव, अनेक कार्यक्रम मला सदैव आपली आठवण देत राहतील, या सर्वांच्या बळावर माझ्या आयुष्यातील हा तीन वर्षांचा प्रवास अविस्मरणीय तर झालाच आणि ही जबाबदारीही अगदी सहजपणे पार करू शकलो, याठिकाणी काम करत असताना मिळालेले आपले मार्गदर्शन, येथील कामाचा अनुभव भविष्यात काम करत असताना नेहमीच मार्गदर्शक बनून प्रेरणा देत राहील.
ही जबाबदारी पार पाडत असताना या ठिकाणी कोणाच्याही भावना दुखावूनये माझ्या हातून लहानात लहान सुद्धा चूक होवू नये या साठी काटेकोरपणे नियामाचे पालन करुन योग्य ती काळजी घेत राहिलो. चूका होउ दिल्या नाहितच परंतु ही जबाबदारी पार पाडत असताना कोणाच्या भावना दुखावल्या असतील, कोणाच्या अहंकारला ठेच पोहोचली असेल तरीही आपण मोठ्या मनाने माफ कराल अशी अपेक्षा करतो. आपण सर्वांनी माझ्यासाठी जे केलं त्या बद्दल आभार एका शब्दात संपवण्याइतकं ते नक्कीच कमी नाही . त्यामुळे मी आपले आभार न मानता आयुष्यभर आपल्या रुणातच राहणं पसंत करेन.
यापुढेही आपले प्रेम, मार्गदर्शन, आशीर्वाद कायमच माझ्यासोबत राहावे अशी विनंती करतो.
सद्ध्या सुरु असलेल्या महाभयंकर कोरोना महामारीमुळे व पुर परिस्थितिमुळे पंढरपुरची स्थिति खुपच बिकट झालेली आहे, या संकटांवर मात करण्याची शक्ति आपणास मिळावी व विठ्ठल रुक्मिणी मंदिर उघडण्याची निर्धोक परिस्थिति लवकरात लवकर येवो हीच श्री रुक्मिणी मातेच्या , आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करतो.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.