ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सोलापूर दौरा, शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा



सोलापूर // प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात अतिवृष्टिमुळे महाराष्ट्रा़च्या अनेक भागात नद्यांना पूर आले यापूरामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

यामध्ये शेतक-यांनी शेतात लावलेली ऊस,डाळिंब,मका,बाजरी अशा पिकांची नासाडी झाली तर अनेकांचे घरे वाहून गेले त्यामुळे या गोरगरीब शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी सांगितले. 



अक्कलकोट मधील सांगवी या गावाला त्यांनी भेट दिली. परतीच्या पावसामुळे सोलापुरातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी स्तरावर मंत्र्यांचे दौरे सुरू असून मदत मात्र कोणत्याही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, काहींना मदतीच्या नावावर चार हजार रुपयांचे धनादेश देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या सर्वांनी बाळासाहेबांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget