(मांडुळाची किंमत 40 लाख रुपये)
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
सदाशिवनगर परिसरामध्ये पोलीस पेट्रोलिंग करत असताना पुरंदावडे पालखी मैदानात अवैद्यरित्या मांडूळाची तस्करी करणा-या तिघांना माळशिरस पोलिसांना अटक केली आहे. संतोष दतात्रय टेळे (वय २४), पोपट रामा टेळे (वय ४५) दोघे राहणार मांडवे,प्रवीण तानाजी दडस (वय २६) रा.तामसिदवाडी यांना ताब्यात घेत मांडूळ हस्तगत करण्यात आले आहे. मांडुळाची किंमत ४० लाख रुपये असल्याचं बोललं जातं आहे.
याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, पुरंदावडे येथील पालखी मैदानामध्ये मांडूळाची तस्करी चालू असल्याची माहिती पोलिसांना गोपिनीय व्यक्तीमार्फत मिळाली.दरम्यान माळशिरस पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शशीकांत शेळके याचं सदाशिवनगर परिसरामध्ये पेट्रोलिंगचे काम सुरु होते.पुरंदावडे येथील पालखी मैदानात तीन इसम अवैद्यरित्या जिवंत मांडूळ सर्पाची ४० लाख रुपयांना विक्री करण्यासाठी येत असल्याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी त्याठिकाणी जाऊन संतोष दतात्रय टेळे, पोपट रामा टेळे,प्रवीण तानाजी दडस यांना ताब्यात घेतले असून मांडूळ हस्तगत करण्यात आले आहे.त्यांनी गुलाबी रंगाच्या प्लास्टिक किटलीमध्ये जिवंत मांडूळ त्याठिकाणी आणले होते.दरम्यान मांडूळ तस्करीचा एजंट तुषार लवटे रा. मेडद हाही पोलिसांच्या हाती लागला आहे. या तस्करीमध्ये वापरण्यात आलेल्या दोन मोटार सायकली,मोबाईल व मांडूळ पोलिसांनी माळशिरस वनविभागाच्या कारवाईसाठी ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू,माळशिरसचे पोलीस निरीक्षक विश्वभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शशिकांत शेळके,सचिन हेंबाडे,समाधान शेंडगे,सोमनाथ माने,दतात्रय खरात,अमोल बकाल यांनी ही कामगीरी केली.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.