वृत्तसंस्था // प्रतिनिधी
दोन ते तीन दिवस झाले सातत्याने पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस होऊन अतिवृष्टी झाली आहे यामुळे सर्व गोरगरीब व कष्टकरी शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाने हिसकावून घेतला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून शेतकरी पूर्णता मेटाकुटीला आला आहे.पंढरपूर तालुक्यांमध्ये गेली दोन ते तीन दिवस झाले अति मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाले आहे प्रत्येक गावांमध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून सर्व शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची दुग्धदुभती जनावरे या पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहेत.
या अतिवृष्टी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे तात्काळ व तातडीने पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी पंढरपूर येथील तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे सादर केली असल्याची माहिती ती बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील भाळवणी, गादेगाव, सुपली, पळशी, खेड भाळवणी, खेड भोसे, शेळवे, शिरढोन,कौठाळी, गुरसाळे, होळे, मुंढेवाडी, अजनसोंड, पटवर्धन कुरोली, देवडे, खेडभोसे, वाडी कुरोली या व इतर सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आहे यामध्ये डाळिंब, द्राक्षे, कांदा, मका, केळी, भुईमूग, त्याचबरोबर काढणीला आलेल्या उसाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करावे व नुकसान भरपाई ताबडतोब शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करावी अशी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) जवळेकर यांनी केली आहे.
हे निवेदन देताना बळीराजा सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,किसान युवा क्रांतीचे प्रतापसिंह चंदनकर,अभिजित पाटील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.