सर्व भाविक भक्तांना कळवीताना आनंद होत आहे कि दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला दि ६ -१-२०२१- ते १०-१-२०२१ ला महा क्षेत्र पंढरपूर संत सेना महाराज मठ येथे ह.भ.प श्री गणेश महाराज शेटे युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या रसमय वाणीतून श्रीकृष्ण कथेचे आयोजन केलेले आहे. तरी भाविकांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती. *कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे* सकाळी 5 ते 6 काकडा भजन , सकाळी 9 ते 12 श्रीकृष्ण कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ रात्री, 8 ते 10 वाजेपर्यंत हरी किर्तन राहील.
*भोजन व्यवस्था*.
सकाळी ६ वाजता चहा, सकाळी ८ वा.नास्ता , सकाळी १२ वा.जेवन, दुपारी ४ वा चहा. रात्री ७ वा जेवण *गायनाचार्य* - विक्रम महाराज शेटे सोपान महाराज ऊकर्डे, पुरुषोत्तम महाराज रौराळे,वैभव महाराज वसु, मोहन महाराज काळे ,रवी महाराज शेटे , रामेश्वर महाराज गाढे , प्रदिप महाराज गायकवाड, गजानन महाराज मोडक *मृदंगाचार्य*-विलास महाराज कराड
पंढरपूरला वारकऱ्यांचे येण्याचे नियोजन महा क्षेत्र पंढरपूर येथील श्री कृष्ण कथेचे आयोजन हे शासनाच्या नियम अटी चे तंतोतंत पालन करून करण्यात येईल आणि कार्यक्रम फक्त शंभर भाविकांच्या उपस्थित होईल . ज्या भाविकांना कथा श्रावणला महा क्षेत्र पंढरपूरला यायचे असेल त्यांना आमच्या कडून कोणत्याही प्रकारची नेण्याची वाहनाची व्यवस्था नाही येणाऱ्या भाविकांना स्वखर्चाने स्वतःच्या वाहनाने किंवा रेल्वे, बसणे पंढरपूरला येता येईल. पंढरपूरला आल्यानंतर संत सेना महाराज मठ येथे श्रीकृष्ण कथा आहे व तिथेच निवासाची सार्वजनिक व्यवस्था राहील आपणास व्यवस्था योग्य न वाटल्यास आपण कोठेही राहू शकता पण राहण्याची व्यवस्था व भोजन देणगी शुल्क प्रत्येकी 1200 रुपये आकारलेला आहे आणि ती सर्वांना बंधनकारक राहील.
*नियम व अटी* १) ज्या भाविकांना श्रीकृष्ण कथा श्रावणाला महा क्षेत्र पंढरपूरला यायचे आहे त्यांनी 30 नोव्हेंबरच्या आत १२०० रुपये देणगी शुल्क, आधार कार्ड झेरॉक्स, पासपोर्ट फोटो व सरकारी दवाखान्यातील फिटनेस सर्टिफिकेट आमच्याजवळ जमा करावे (२) आम्हाला न कळवीता महा क्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना नम्र विनंती राहील त्यांनी कथेच्या नियोजनात प्रवेश करु नये (३) स्वतःचे अंथरूण-पांघरूण नेहमीच्या औषधी सोबत घ्याव्यात (४) आमचे नियोजन हे शासनाच्या नियमाच्या अधीन असल्यामुळे येणाऱ्या भाविकांना शासनाचे नियम पाळूनच कार्यक्रमांमध्ये सहभाग घेता येईल (५) येणाऱ्या भाविकांनी सोबतच सेनी टायझर ,माक्सचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे बंधनकारक राहील. (६) पंढरपूर कथा नोंदणी तारीख 30 नोव्हेंबर दिलेली आहे परंतु तीस तारखेच्या आधी जर अपेक्षित बुकिंग संख्या पूर्ण झाली तर भाविकांची नावे नंतर स्वीकारल्या जाणार नाही म्हणून लवकरात लवकर आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी ही विनंती (७) आपण आपल्या नावाची नोंदणी केल्यानंतर जर वेळेवर पंढरपूरला येऊ शकले नाही तर देणगी शुल्क परत मिळणार नाही
टिप:- ज्या भाविकांना महा क्षेत्र पंढरपूर येथील कथेला चहा नाश्ता किंवा अन्नदान करायचे असेल त्यांनी संपर्क साधावा
कार्यक्रमाला विशेष सहकार्य व उपस्थिती ह भ प अरुण महाराज बुरघाटे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष , ह भ प श्री तुकाराम महाराज चवरे विश्व वारकरी सेना राष्ट्रीय अध्यक्ष, ह भ प जगन्नाथ महाराज देशमुख विश्व वारकरी सेना युवक राष्ट्रीय अध्यक्ष , ह भ प तुकाराम महाराज भोसले विश्व वारकरी सेना राष्ट्रीय संपर्कप्रमुख
आयोजक गणेश महाराज शेटे अध्यक्ष - योग योगेश्वर संस्थान वरुर जऊळका तथा युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.