दिलीप (बापू) धोत्रे यांनी मुख्यधिकाऱ्यांची मानोरकर यांची भेट घेऊन जिजामाता शॉपिंग सेंटर मधील व्यापार्‍यांच्या प्रश्नाबाबत दिले निवेदन.





पंढरपूर // प्रतिनिधी 

गेल्या दोन दिवसा खाली पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण पंढरपूर शहरातील व ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे सर्वच लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याच प्रमाणे पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांचे लाखो  रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच पंढरपूर मध्ये मोठा महापूर येऊन गेल्यामुळे संपूर्ण पंढरपूर शहरातील नगरपालिकांच्या व्यापारी गाळ्यांमध्ये ते पावसाचे चे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच अनुषंगाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची भेट घेऊन जिजामाता शॉपिंग सेंटर मधील सर्व गाळया

मधील पाणी काढून तसेच सर्व व 

गाळयांची उंची वाढवून देण्याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली तसेच अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच या बाबतीत मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना निवेदन सादर केले.

यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बाप्पू धोत्रे यांच्याबरोबर मनसे शहर उपाध्यक्ष महेश पवार नागेश इंगोले अभिजित डुबल व्यापारी सचिन घोडके, दिलीप वाघमारे, कुमार जाधव, लियाकत तांबोळी, धोंडीराम माळी, मोहन माळी, गणपत टाकणे, मधुसूदन भट्टड, श्रीकांत राठी आदी सर्व व्यापारी मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget