वृत्तसंस्था // प्रतिनिधी
हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले. उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या मृतदेहावर मध्यरात्री परस्पर अंत्यसंस्कार करून या भयनाटय़ात भर टाकून आणखी रोष ओढवून घेतल्याचे बुधवारी समोर आले. १९ वर्षांच्या तरुणीवर १५ दिवसांपूर्वी हाथरसमधील चौघा उच्चवर्णीयांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप असून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर पोलिसांनी परस्पर या मुलीचे अंत्यसंस्कार केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याच प्रकरणावरुन आता आम आदमी पार्टीचे आमदार अजय दत्त यांनी पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर तिला जर सरकारी रुग्णवाहिकेमधून नेण्यात आलं तर त्या रुग्णवाहिकेला नंबर प्लेट का नव्हती ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून पीडितेचे पार्थिव घेऊन जाण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेला नंबर प्लेट का नव्हती ?. यामागील गूढ काय आहे. जर ही सरकारी रुग्णवाहिका होती तर त्यावर नंबर प्लेट का नव्हती?, असा प्रश्न दत्त यांनी विचारला आहे. यासंदर्भात आपण अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता त्यांनी आपल्याला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप दत्त यांनी केला आहे. दत्त हे सफदरजंग रुग्णालयामध्ये पीडितेच्या कुटुंबियांनाही भेटायला गेले होते असं न्यूज १८ हिंदीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. पीडितेच्या कुटुबियांना सतत धमक्या दिल्या जात होत्या. मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा तिने नंबर प्लेट नसणारी रुग्णवाहिका असल्याचे मला दिसले. मी जेव्हा पोलिसांना यासंदर्भात विचारले असता पोलिसांनी आम्हाला मारणार करण्यास सुरुवात केली. “दोन वेळा आमदार झालेल्या व्यक्तीबरोबर दिल्ली पोलीस असं वागले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.