सोलापूर // प्रतिनिधी
संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेला वजा सहकारी साखर कारखान्यावर आज पर्यंत संपूर्ण पंढरपूर तालुक्याचे अर्थकारण राजकारण व समाजकारण झाले असा वेणुनगर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना
आपला चाळीसावा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी सज्ज झाला असून कारखान्याचे चेअरमन आ. भारत नाना भालके साहेब यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा ४० वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ दिनांक 8 10 2020 रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी संपन्न होणार आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कारखान्याचे संचालक मा. श्री भगीरथ भारत भालके व त्यांच्या सुविद्य पत्नी मा. सौ प्रणिता भगीरथ भालके यांच्या शुभहस्ते व ह.भ.प.किरण बोधले महाराज, यांच्या अध्यक्षतेखाली व मर्चंट बॅंकेचे माजी चेअरमन संजय देविदास भिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. हि कार्यक्रम पत्रिका सोशल मीडियावर वायरल होताच सर्व विठ्ठल परिवारातील व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या गळीत हंगाम मध्ये बंद असलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना या वर्षी सुरू होत असल्यामुळे चालू गळीत हंगाम साठी सर्व कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हे एक समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.




Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.