बंधा-यावरील अवजड वाहतूक बंद करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू बळीराजा शेतकरी संघटना.





 सोलापूर प्रतिनिधी:- पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली - पिराची कुरोली व अजनसोंड - मुंडेवाडी बंधा-यावरून अवजड वाहनांची वाहतूक होत आहे.



सदरील ठिकाणीचे बंधारे महाराष्ट्र शासनाने शेतक-यांना व नागरिकांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी बांधले आहे असे असताना बंधा-यावरुन खडी, मूरूम, दगड, वाळू अशा प्रकारच्या अवजड वाहतूकीमुळे बंधा-याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या महापुरावेळी सदर बंधारे पूर्णतः खचले आहे. त्यातच अशा प्रकारच्या अवजड वाहतूकीमुळे सदरील बंधा-यास भेगा पडलेल्या  आहे अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली जवळेकर यांनी दिली. 


भविष्यात बंधा-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते म्हणून या बंधा-यावरील होणारी अवजड वाहतूक तातडीने पूर्णतः बंद करावी व होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा असे न केल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर यांनी दिला आहे.



यावेळी माऊली हळणवर, गोपाळ पाटील, तानाजी सोनवले, औदुंबर सुतार,सोमनाथ कोळेकर, अमन मुजावर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget