अजित दादा पवार यांनी पाटील परिवाराची घेतली सांत्वनपर भेट




गणेश पाटील व पाटील कुटुंबाच्या यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहु : ना. अजित पवार

सोलापूर // प्रतिनिधी 

राजूबापू पाटील हे अतिशय विश्वासू व निष्ठावान सहकारी होते त्यांचे निधनाने पक्षाचे तसेच पाटील कुटुंबियांचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यांच्या  पश्चात त्यांचे पुत्र गणेश पाटील यांच्यावरती आमचे पूर्ण लक्ष राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष (कै.) राजूबापू पाटील,  त्यांचे बंधू महेश पाटील व चुलते प्रा. डॉ. अनंत पाटील या तिघांचे पंधरा दिवसांच्या अंतराने कोरोना मुळे निधन झाले होते. 



ना. अजित पवार हे आज (दि. 17) पंढरपूर तालुक्याच्या पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी  त्यांनी भोसे (ता.पंढरपूर) येथे येऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत आ. भारत भालके, आ. बबनदादा शिंदे, आ. संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन ढोले उपस्थित होते.

ना. अजित पवार यांनी भोसे येथील राजूबापू पाटील यांच्या निवासस्थानी राजूबापू यांचे  पुत्र उपसरपंच गणेश पाटील , बंधू शेखर पाटील व चुलते भोसे सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्याशी सुमारे वीस मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांनी पाटील परिवारातील सर्व कुटुंबांची चौकशी करून  कृषिराज शुगर कारखान्याच्या प्रगतीची माहिती घेतली व राजूबापू यांच्याप्रमाणेच आता गणेश पाटील  यांचेकडे आम्ही लक्ष देऊ अशी ग्वाही उपस्थितांना दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात, करकंबचे सरपंच आदिनाथ देशमुख, आशिष पाटील, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget