जळगाव प्रतिनिधी:- कोंढावळ ता.अमळनेर, येथील सुप्रिम माऊली कोंढावळकर,यांना राज्यस्तरीय आदर्श किर्तन सेवा प्रबोधन रत्न पुरस्कार, जाहीर झाला. गावा गावात जावुन किर्तनाच्या माध्यमातुंन समाज प्रबोधन करणे, एकात्मता टिकावी यासाठी किर्तना च्या माध्यमातु न प्रयत्न करने. तरुण पिढीला व्यसना पासुन दुर राहणे.यासाठी प्रयत्नं करने,आणि आध्यत्मिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल अत्यंत मानाचा समजला जाणारा मुंबई येथील राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन 2020 आयोजित "मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी" यांच्या वतीने दिला जाणारा "राज्यस्तरीय आदर्श किर्तन सेवा प्रबोधन रत्न पुरस्कार 2020" हा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक-अध्यक्ष अॅड.कृष्णाजी जगदाळे यांनी दिली.
सुरवातीला हा राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन हे दि.29 सप्टेंबर 2020 रोजी नाशिक येथे मोठ्या उत्साही वातावरणात साजरे होणार होते.परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर या संमेलनाची तारीख बदल्यात आली आहे.या पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, लक्षवेधी गौरवपदक, विशेष महावस्त्र,खास मानपत्र, मानकरी बॅच आणि मानाचा फेटा असे असून नामवंत पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सुप्रिम माऊली यांच्या माहिती असे निर्दशनास आले की ज्या गावात त्यांची किर्तन पारं पडली त्यातील 3%गाव वः त्यागावातील तरूण पिढी व्यसनं सोडुन,आनंदी जिवन जगत आहे.आणि याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श किर्तन सेवा प्रबोधन रत्न पुरस्कार'' जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक-अध्यक्ष अॅड कृष्णाजी जगदाळे,संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश सावंत,संमेलनाचे स्वागत अध्यक्ष के.एल.गोगावले,तसेच पंडित जवाहरलाल नेहरू सहकारी शेती विद्यालय नवलगर,तसेच श्रम साफल्य इजूकेशन सोसायटी संचलित, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर,संस्थेचे चेअरमन: दादासो.सुभाष दादा भांडारकर,तसेच प्राचार्य:डॉ.पी.एस.पाटीलसर,शिक्षक वृंद,खेडकर मॅडम,वैद्य मॅडम,सरर्वैय्या मॅडम,खंडागळे सर, चव्हाण सर,बोरसे सर, वाघमारे सर, ढगे सर, वाणी सर,सोनार मॅडम यांनी सुप्रिम माऊली यांचे अभिनंदन केले.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.