पंढरपूर // प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यामधील जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सदर आजार संसर्गजन्य असल्याने या रोगाचा प्रसार बाधित जनावरांपासून निरोगी जनावरांना स्पर्शाद्वारे, बाह्यकिटकाद्वारे, लाळ व स्त्राव इत्यादी माध्यमातून होतो. सदर रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सद्यस्थितीत आवश्यक आहे. सोलापूर जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित केलेला असून जनावरांना ने-आण करण्यास मनाई, प्राण्यांचे बाजार भरणे प्राण्यांची शर्यती लावणी प्राण्यांची जत्रा भरविणे प्राण्यांची प्रदर्शन आयोजित करणे आणि प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून आणि काम पार पाडणे या महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. 21/9/2020 नुसार मा. जिल्हा पशुसंवर्धन उप-आयुक्त, सोलापूर यांचे कडील जा.क्र. जिपउआ सो/तां/एलएसडी/ 4378 /2020 सोलापूर-4 दि. 29/10/2020 रोजीचे पत्रने मनाई करण्यात आली असून जनावरांचा बाजार बंद करणे विषयी उचित कार्यवाही करणेबाबत कळविलेले आहे तसेच कोरणा विषयानुसार वाढत्या प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून दि. 30/11/2020 पर्यंत लवकर उंची बंधनी लागू केलेली आहेत त्यामुळे दि. 22/11/2020 ते दि. 28/11/2020 अखेर कर्तिक यात्रा कालावधीत मध्ये भरणाऱ्या बाजारात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्तिकी यात्रा कालावधीत भरणारा जनावरांचा बाजार बाजार समितीच्या वतीने रद्द करण्यात येणार आहे.
तरी सर्व शेतकरी पशुपालक, जनावरांचे व्यापारी व संबंधित घटकांनी कार्तिकी यात्रा जनावरांच्या बाजारात कृपया आपली जनावरे खरेदी-विक्रीसाठी आणू नये याची नोंद घ्यावी व बाजार समिती सहकार्य करावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती मा.श्री. दिलीप (अप्पा) तुकाराम घाडगे व उपसभापती मा.श्री. विवेक (काका) देविदास कचरे यांनी केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.