31 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेनेच्या आंदोलनावेळी शासनाने दिलेला शब्द पाळला बद्दल शासनाचे मनःपूर्वक हार्दिक आभार:-हभप गणेश महाराज शेटे






वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

कोरोना संकटामुळे गेल्या सात महिन्यांपासून महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती आणि त्यामुळे सर्व  वारकरी संघटनांनी आपापल्यापरीने सरकारला निवेदन देऊन आंदोलन केले व विश्व वारकरी सेनेच्या वतीने महा क्षेत्र पंढरपूर येथे अमरण उपोषण व मंदिर प्रवेश आंदोलन करण्यात आले व मंदिर प्रवेश आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः उपस्थित राहून महा क्षेत्र पंढरपूर आंदोलना दरम्यान बुरघाटे महाराज आणि आंबेडकर साहेब यांच्यावतीने माननीय मुख्यमंत्री साहेबां सोबत फोनवर चर्चा केली असता नियमावली आखून त्वरित मंदिरे उघडण्यात येतील हे सांगण्यात आले होते आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द पाडल्याबद्दल राज्य सरकारचे विश्व वारकरी सेनेच्या वतीने जाहीर आभार मानण्यात येत आहेत या आंदोलना मध्ये गणेश महाराज शेटे, जगन्नाथ महाराज देशमुख , विठ्ठल महाराज साबळे,तुकाराम महाराज चवरे, तुकाराम महाराज भोसले ,नामानंद महाराज,व विश्व वारकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी मंडळी यांनी अथक प्रयत्न करून हे कार्य सिद्धीस नेले विश्व वारकरी सेनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व वारकरी मंडळींचे आम्ही आभार त्याचप्रमाणे महा क्षेत्र पंढरपूरला आंदोलनात सोबत असणारे वंचित बहुजन आघाडीचे वांजळे साहेब , आनंद चंदनशिव, अशोक भाऊ सोनवणे, प्रदीप भाऊ वानखडे, पांडे गुरुजी, संतोषभाऊ रहाटे, गजाननराव दांदळे, पराग गवई व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget