सोलापूर शहर युवक काँग्रेस वतीने 8 नोव्हेम्बर नोटाबंदीचा चौथा वर्षश्राद्ध घालून अर्थव्यवस्थेचा काळा दिवस पाळण्यात आला




सोलापूर // प्रतिनिधी 

8 नोव्हेम्बर रोजी नरेंद्र मोदींनी रात्री अचानकपणे नोटबंदी जाहिर केली. म्हणून सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापूर येथे ही नोटाबंदीचा चौथा वर्षश्राद्ध घालून, नोटाबंदिच्या रांगेत उभारुन मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करुन भारतीय इतिहासातील अर्थव्यवस्थेचा काळा दिवस म्हणुन पाळण्यात आला. यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, दक्षिण विधानसभा अध्यक्ष सैफन शेख, प्रदेशचे राहुल वर्धा, राहुल गोयल, महेश लोंढे, संजय गायकवाड़, डॉ. अरमान पटेल, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, अनवर शेख, सौरभ सालुंखे, यांच्यासह इतर प्रमुख उपस्थित होते.


यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले म्हणाले की चार वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणताही सारासार विचार न करता नोटाबंदी घोषित केली ही नोटाबंदी नव्हती तर ती व्यवस्थेची नसबंदी करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले होते. त्याचा परिणाम गेल्या चार वर्षापासून आपण पाहतोय कोट्यावधी नागरिकांचे रोजगार गेले, लाखो उद्योगधंदे बंद पडले, शेतीव्यवसाय, रियल इस्टेट, संकटात सापडला तो आजपर्यंत सुधरू शकला नाही, आणि ज्या उद्देशाने नोटबंदी केली तो काळा पैसा बँकेत जमा झालाच नाही आणि चलनातील 99% पैसा बँकेत जमा झाला, बँकेच्या रांगेत उभा राहून हक्काचे पैसे घेत असताना देशातील जवळपास दीडशेपेक्षा जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला पंतप्रधान मोदी च्या चुकीच्या निर्णयामुळे जवळपास दीडशे नागरिकांचे बळी जात असतील तर त्याला जबाबदार कोण त्यासाठी नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागितली पाहिजे म्हणून 8 नोव्हेंबर देशाच्या इतिहासातील अर्थव्यवस्थेचा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला पाळण्यात आला आहे.


 तसेच यावेळी सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे म्हणाले की बरोबर चार वर्षांपूर्वी अचानक पणे तुघलकी निर्णय घेऊन नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली गोरगरीब नागरिकांना आपल्या पाल्यांच्या लग्नासाठी, दवाखान्यासाठी, व आवश्यक कामासाठी जमा केलेला पैसा बँकेतून काढायला रांगेत उभे राहावे लागले. पैसे मिळाले नसल्यामुळे अनेकांचे लग्न तुटले, दवाखाना खर्च भागू न शकल्यामुळे तसेच बँकेचे रांगेत अनेक जण मरण पावले या सर्वांचा आम्ही निषेध करून या नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आम्ही करत आहोत आज 8 नोव्हेंबर रोजी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने नोटबंदीचा चौथा श्राद्ध घालून नोट बंदीच्या रांगेत उभारुन मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून 8 नोव्हेंबर भारतीय अर्थव्यवस्थेतील काळा दिवस म्हणून पाळण्यात आला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget