बळीराजा शेतकरी संघटनेच्या मोहोळ तालुक्यातील विविध निवडी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न.




सोलापूर // प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये व्याप्ती असलेल्या बळीराजा शेतकरी संघटनेच्या आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील निवडी संपन्न झालेल्या आहेत गोरगरीब व कष्टकरी शेतकऱ्यांच्या  सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या बळीराजा शेतकरी संघटनेला सोलापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त बळकटी देण्यासाठी या निवडी आम्ही करीत असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) जवळेकर यांनी यावेळी सांगितले.



यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेच्या युवा आघाडी जिल्हाध्यक्षपदी वडवळ येथील नानासाहेब मोरे यांची तर मोहोळ तालुक्याच्या तालुकाध्यक्षपदी विठ्ठल ढोबळे यांची ची युवा अध्यक्षपदी संदीप शिरसागर, मोहोळ तालुका उपाध्यक्ष पदी देविदास चंदूले (ठाकरे) यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हरकते, युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) जवळेकर, जिल्हा संघटक शेखर कोरके, जिल्हा उपाध्यक्ष रमेश भोसले, पंढरपूर तालुका अध्यक्ष नितीन गावडे, आप्पासाहेब मुळे, सूर्याजी मोरे, गौतम जगताप, व इतर सर्व बहुसंख्य पदाधिकारी व शेतकरी या निवडी प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget