15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत
सोलापूर // प्रतिनिधी
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारित संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांनी 15 डिसेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन स्मार्टचे प्रकल्प संचालक धीरज कुमार यांनी केले आहे.
शेतमाल, शेळ्या आणि परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मूल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी आहेत. मूल्यसाखळी विकासाचे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प आणि बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पासाठी सदर अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना यांची माहिती http:/www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थामध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे. पात्र खरेदीदारांमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील कॉर्पोरेट्स, प्रक्रियादार, निर्यातदार, लघु-मध्यम उद्योजक, स्टार्टअप्स, कोणताही खरेदीदार यांचा समावेश आहे.
प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी स्पर्धात्मक व उत्कृष्ट अर्जांना प्रकल्पाचे 60 टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध होईल. इच्छुकांनी आपले अर्ज 15 डिसेंबर 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्मार्टच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन श्री.कुमार यांनी केले आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.