मनसे नेत्या ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी


 पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना एका व्यक्तीने "जिथे असशील तिथे संपवून टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करु नको" असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारी व्यक्ती साताऱ्यातील असल्याचे समजते. याप्रकरणी ॲड. पाटील यांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. या धमकीच्या फोनमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.


राज्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. पुण्यात मनसेकडून माजी नगरसेविका रूपाली पाटील यांच्यासह अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रोपींनं फोन करून ‘तू जिथे असशील तिथे संपवू टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस,’ अशी धमकी दिली आहे.  दरम्यान, अज्ञाताविरोधात ॲड. रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली असून धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.  


गेल्या अनेक दिवसापासून त्यांचा प्रचार सुरु असून पुणे, सातारा, कोल्हापूर याठिकाणी त्यांनी भेटी देवून पदवीधरांशी साधला आहे. अशातच ॲड. पाटील यांना फोन करुन एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. निवडणुकीच्या निमित्ताने रविवारपासून रुपाली पाटील ठोंबरे सातारा दौऱ्यावर आहेत. अशावेळी धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षा पुरविण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. दरम्यान, धमकीला मी घाबरणारी नाही. विद्यार्थी शिक्षकांच्या अधिकार आणि हक्कांसाठी मी लढत राहीन, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी धमकीनंतर व्यक्त केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget