वृत्तसंस्था // प्रतिनिधी
आज मुंबईत कृष्णकुंज येथे महाराष्ट्रातील उमेदच्या शिष्टमंडळाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन देण्यात आले.
उमेदच्या महाराष्ट्रातील सर्वच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला आहे असून एका खाजगी कंपनीकडून हे काम सरकार करणार आहे. एका खाजगी कंपनीला हे टेंडर देण्यात आले आहे. त्यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार होणार आहे. हे काम सरकारने कोणत्याही खाजगी कंपनीला देऊ नये आणि आमचे संसार वाचवा अशी विनंती महाराष्ट्रातील सर्वच कर्मचाऱ्यांनी राजसाहेब ठाकरे यांच्याकडे केली.
यावेळी राजसाहेब यांनी सर्वांची विनंती ऐकून त्यांनी ताबडतोब महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना फोन केला असता उमेदच्या लोकांवर अन्याय होऊ देऊ नका असे आदेश दिले. ग्रामविकास मंत्री यांनी आम्ही उमेदच्या कर्मचाऱ्यांवर कसलाही अन्याय करणार नाही,कामावरून काढणार नाही असे वचन राजसाहेब ठाकरे यांना दिले
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर,मनसे नेते अमित ठाकरे, प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे, शेतकरी सेना प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे,उपाध्यक्ष आनंद एबडवर,सहकार सेना सरचिटणीस विठ्ठल लोखंडकर इत्यादी उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.