वृत्तसंस्था // प्रतिनिधी
धार्मिक कार्यक्रमाला नियम अटी लावून १०० भाविकांना परवानगी देण्यात यावी अन्यथा २ डिसेंबर ला अकोला जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण,
मा. मुख्यमंत्री उद्धवरावजी ठाकरे साहेब व जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर साहेब अकोला व अकोला एस पी जी. श्रीधर साहेब
आपण महाराष्ट्रातील देवस्थान खुली केल्याबद्दल विश्व वारकरी सेनेतेंर्फे राज्य सरकारचे व प्रशासनाचे हार्दिक आभार व अभिनंदर करतो. पण मंदिर उघडल्यानंतर सुद्धा गावोगावी साप्ताह करण्याकरिता रीतसर पोलीस स्टेशन मधून परवानगी मिळत नसल्यामुळे वारकरी संप्रदायमध्ये एक प्रकारे सरकारविषयी नाराजीचा सूर दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अखंड हरीनाम साप्ताह पोलीस स्टेशनची परवानगी न घेता चालू आहेत पण साप्ताह नियोजन करीत असताना काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पोलीस कार्यवाहीची भीतीसुद्धा आहे कोरोना कालखंडामध्ये गेल्या ८ महिन्यापासून कथा कीर्तन बंद असल्यामुळे वारकरी संप्रदायातील गायक वादक मंडळी आणि परिस्थितीने सर्वसामान्य असलेली कीर्तनकार मंडळी आर्थिक संकटाचा सामना देत आहेत कथा, कीर्तन, गायन, वादन करणे हा आमचा वारकऱ्यांचा व्यवसाय नसून एक साधना आहे पण कथा कीर्तन गायन वादन केंयानंतर साप्ताह कमिटी स्वइच्छेने जे मानधन देतात त्या मानधनामध्ये प्रपंचही चालतो आणि परमार्थही होतो आणि म्हणून आमची आपणास नम्र विनंती आहे आपण जर लग्नाला 100 लोकामध्ये परवानगी देत आहात,झी टॉकीज वरील गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाच्या शूटिंगला 100 श्रोत्यांना परवानगी देत आहात तर धार्मिक कार्यक्रमाला सुद्धा नियम अटी लावून परवानगी देण्यात यावी वारकरी संप्रदाय हा शिस्तप्रिय संप्रदाय असून आपण दिलेल्या नियमांचे कुठेही उल्लंघन करणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो म्हणून लवकरात लवकर महाराष्ट्रातील गावागावामध्ये धार्मिक कार्यक्रमाला रीतसर लवकरात परवानगी द्यावी अन्यथा येत्या २ डिसेंबर ला अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि या आमरण उपोषणाला फक्त धार्मिक संघटनांचा समावेश असून कोणत्याही राजकीय पक्षाचा आम्ही पाठींबा स्वीकारणार नाही म्हणून आपणास विनंती आहे वारकऱ्याला उपोषणास बसण्याची वेळ येवू न देता धार्मिक कार्यक्रमाला लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी हि नम्रविनंती.
यांना प्रतीलीपी पाठविण्यात आली मा. मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब, मा. उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब, मा. आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब, मा. गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेब, पालकमंत्री अकोला बच्चुभाऊ कडू, पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, आ. नितीन बाप्पू देशमुख, आ. अमोलदादा मिटकरी, पोलीस स्टेशन अकोला शहर निवेदन देण्याकरिता उपस्थित महाराज मंडळी हभप गणेश महाराज शेटे(विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष), हभप रामकृष्ण महाराज अम्बुस्कर (विश्व वारकरी सेना अकोला शहराध्यक्ष), हभप महादेव महाराज निमकांडे(वारकरी संत साहित्य परिषद अकोला जिल्हाध्यक्ष), हभप विठ्ठल महाराज साबळे (विश्व वारकरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष), हभप प्रवीण महाराज कुलट (स्वरसम्राज्ञ अकोला जिल्हाध्यक्ष), हभप शिवा महाराज बायस्कर (विश्व वारकरी सेना अकोला जिल्हाध्यक्ष), हभप गोदावरीताई बंड ( विश्व वारकरी सेना महिला अकोला जिल्हाध्यक्ष), हभप सोपान महाराज उकर्डे (विश्व वारकरी सेना अकोला उपजिल्हाध्यक्ष), हभप विक्रम महाराज शेटे (विश्व वारकरी सेना अकोला जिल्हा कार्याध्यक्ष), हभप शिवहरी महाराज इस्तापे (विश्व वारकरी सेना बाळापुर तालुकाध्यक्ष), हभप मंगेश महाराज ठाकरे (विश्व वारकरी सेना अकोट तालुकाध्यक्ष), हभप विजय महाराज राउत (विश्व वारकरी सेना, हभप ज्ञानेश्वर महाराज पातोंड( स्वरसम्राज्ञ अकोला उपजिल्हाध्यक्ष), हभप श्रीधर महाराज तळोकार( स्वरसम्राज्ञ अकोट तालुकाध्यक्ष), हभप गोपाल महाराज बाहे(विश्व वारकरी सेना मुर्तीजापूर तालुकाध्यक्ष), हभप विलास महाराज कराड, मनोज महाराज टाले उपस्थितीत होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.