मोहोळ तालुक्यातील लोकनेते कारखान्यात आज बायोगॅसची टाकी कोसळून दोन कामगारांचा मृत्यू!



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

अनगर तालुका मोहोळ येथील लोकनेते साखर कारखाना बायोगॅसची टाकी अचानकपणे खाली कोसळून झालेल्या अपघातामध्ये दोघांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. तर अन्य आठ कामगार जखमी झाले आहेत. शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी पावणेबाराच्या सुमारास कारखान्याच्या आसावरी विभागात घटना घडली. यामध्ये ज्योतीराम दादा वगरे वय ४५ राहणार बिटले सुरेश अंकुश चव्हाण वय २२ राहणार बिटले अशी मृतांची नावे आहेत.


तर सज्जन बाळू जोगदंड वय २२ राहणार बिटले मंगेश नामदेव पाच पुंड राहणार अनगरआणि वय ३० महेश दिलीप बोडके राहणार अनगर वय ३० कल्याण किसन गुंड राहणार बिटले वय ३५ परमेश्वर मधुकर थिटे राहणार नालबंदवाडी वय ३५ राजू दत्तात्रय गायकवाड राहणार कुरणवाडी वय ३० रवींद्र गजेंद्र काकडे राहणार अनगर वय २८ हे जखमी झाले आहेत जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांना मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे याबाबतचा अपघाताची नोंद मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget