एनडीए'चा चमत्कार; बहुमताच्या दिशेने वाटचाल, भाजप सर्वाधिक जागा जिंकणार?

वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

पाटणा बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासानंतर चमत्कार झालेला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूर्णपणे पिछाडीवर पडलेल्या भाजपप्रणित ‘एनडीए’ने जोरदार पुनरागमन केले आहे. एवढेच नव्हे तर ‘एनडीए’ने राजद-काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महागठबंधनला मागे टाकत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार, एकूण 243 जागांपैकी 131 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर महागठबंधन अवघ्या 96 जागांवर पुढे आहे. त्यामुळे एनडीए बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 जागा जिंकून बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापन करेल, असे चित्र तुर्तास दिसत आहे.

तर दुसरीकडे या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. सध्या भाजपचे उमेदवार 71 जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपपेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या संयुक्त जनता दलाचे (जदयू) उमेदवार 52 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता बिहारमध्ये भाजप हा मोठा भाऊ होणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता ‘एनडीए’ची सत्ता आल्यास नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे वचन भाजप पाळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ‘राजद’ने मोठी आघाडी घेतली होती. महागठबंधनने जवळपास 113 जागांपर्यंत मुसंडी मारली होती. त्यामुळे महागठबंधन सहजपणे सत्ता स्थापन करेल, असे सांगितले जात होते. मात्र, अवघ्या काही तासांत हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. सध्याच्या घडीला राजद 60 तर काँग्रेस 20 आणि डावे पक्ष 17 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे महागठबंधनची घौडदौड 100 जागांपर्यंत सिमीत राहण्याची शक्यता आहे.

Tags

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget