पत्रकार सुरक्षा समितीची बैठक संपन्न





(इथून पुढे आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार)


सोलापूर // प्रतिनिधी 

पत्रकार सुरक्षा समितीची मासिक बैठक घेण्यात आली सदर बैठीकीत पत्रकार संरक्षण कायदाजेष्ठ पत्रकार समान पेन्शन

पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची सखोल चौकशीपक्की घरे नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल

योजना व विमा योजना

राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी

यादीवर नसलेल्या वृत्तपत्र ला शासकीय जाहिराती

इत्यादी विषयासह 

कोरोना काळात अनेक वृत्तपत्र बंद असताना राज्यातील अनेक युट्युब चॅनल च्या संपादक आणि पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून जीव धोक्यात घालून राज्य सरकार महसूल प्रशासन पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन च्या बातम्या केलेल्या आहेत अश्या युट्युब  चॅनल ला  मुख्यमंत्री महोदयांनी शासकीय मान्यता व जाहिराती द्याव्यात अशी मागणी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे.  त्याच बरोबर कोरोना काळात वार्तांकन करताना ज्या पत्रकारांचे निधन झाले आहे त्यांच्या कुटूंबाला पन्नास लाख रुपये तात्काळ मदत करावी अशी मागणी देखील प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे 

यावेळी शहर अध्यक्ष अरुण सिदगिड्डी डॉ रवींद्र सोरटे, अक्षय बबलाद, बिपीन दिड्डी, लक्षण गणपा, प्रसाद जगतात प्रसाद ठक्का प्रदीप पेंदापल्लीवार, भास्कर माचण, राजाभाऊ पवार, सतीश गडकरी, वैजिनाथ बिराजदार, प्रभाकर एडके, विवेकानंद खेत्री, आन्सर तांबोळी, भास्कर अल्ली, राकेश वरम, श्रीनिवास पेद्दी, इम्तियाज अक्कलकोटे, दत्तात्रय गांगजी, इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget