पंढरपूर // प्रतिनिधी
शासकीय नियमांचे पालन करून कलाकारांना कार्यक्रम करण्यास परवानगी द्या.तसेच कलाकारांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी मराठी रंग भूमी दिनांनिमित्त पंढरपूर शहर तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांचा मेळावा पंढरपूर येथील योग भवन येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी पंढरपूर शहरातील अनेक कलाकार उपस्थित होते.
कोरोनामुळे कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे.यामुळे आर्थिक चणचण भासत आहे.त्यामुळे कलाकारांची अडचण लक्षात घेऊन शासनाने सर्व शासकीय नियम पाळून कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी तसेच कलाकारांच्या मुलांची शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करण्यात यावी,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कलाकारांना तातडीची आर्थिक मदत शासनाने जाहीर करावी, लघुपटांना अनुदान सुरू करावे यासह अनेक प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे असलेल्या मनसे नेते दिलीप धोत्रें यांनी संपूर्ण देश सुरू झाला असताना कलाकारांना कार्यक्रम करण्यास परवानगी का दिली जात नाही असा सवाल करत आपण यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी धोत्रें यांनी सर्व कलाकारांना दिले.
मराठी रंग भूमी दिनांनिमित्त पंढरपूर शहर तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांचा मेळावा पंढरपूर येथील योग भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे, शिवसेना नेते संजय घोडके, नगरपालिका विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, प्रांत अधिकारी सचिन ढोले, नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकार,कलाकार विनय महाराज बडवे, गणेश गोडबोले, रवी शेवडे, प्रमोद राजहंस, सतीश कुलकर्णी ,शाहीर राजू कांबळे, शाहीर गोरे, भारुड कलाकार सौ संध्या साखी इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.