सोलापूर // प्रतिनिधी
येत्या दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी पंढरपूर येथे भागवत एकादशी म्हणजेच कार्तिकी यात्रा भरणार आहे यानिमित्ताने श्री शेत्र पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेचा सोहळा दरवर्षी पार पडतो चालू वर्षी कोरणा-या महाभयंकर आजाराने थैमान घातलेले असल्यामुळे पंढरपूर येथील सर्व यात्रा (माघी/ चैत्री/आषाढी प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या) व कोणतेही सण उत्सव साजरे करण्यात आले नव्हते. आता या साठीच. पंढरपूर येथील वारकरी सांप्रदायातील फडकरी महाराज मंडळी, संतांचे वसंज उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सर्वजण भेट घेणार असून यामध्ये पंढरपूर येथील वारकरी संप्रदाय पाईक संघाचे श्री ह भ प देवव्रत उर्फ राणा महाराज वासकर यांच्या अध्यक्षतेखाली व पंढरपूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांच्या उपस्थित ही भेट होणार असून या भेटीमध्ये समस्त वारकरी संप्रदायातील संस्थांचे वंशज मठाधिपती स्थानिक स्वराज्य मंडळींना व वारकरी संप्रदायाच्या विविध प्रश्नांसंदर्भात ही भेट असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप (बापु)धोत्रे यांनी सांगितले आहे. या भेटीसाठी श्री ह भ प देवव्रत महाराज वासकर, श्री ह भ प संजय महाराज देहुकर, श्री ह भ प भागवत महाराज चवरे, श्री ह भ प निवृत्ती महाराज नामदास, श्री ह भ प विष्णु महाराज कबीर, श्री ह भ प एकनाथ महाराज हांडे, श्री ह भ प रंगनाथ महाराज राशिनकर, श्री ह भ प मोहन महाराज बेलापूरकर, श्री ह भ प जगन्नाथ महाराज देशमुख, श्री ह भ प सुधाकर महाराज इंगळे, श्री ह भ प रामकृष्ण महाराज वीर हे व आदी सर्व वारकरी संप्रदायातील समस्त महाराज मंडळी या भेटीमध्ये सहभागी होणार असून यामध्ये त्यांच्या विविध समस्या व प्रश्नाबाबत माननीय राज साहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप (बापु)धोत्रे यांनी सांगितले.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.