श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या चेअरमन निवड 21 डिसेंम्बर रोजी होणार

 



पंढरपूर प्रतिनिधी:- कै.आ.भारतनाना भालके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची निवड येत्या सोमवारी ( दि.21 डिसेंबर ) रोजी होणार आहे.


चेअरमन पदाची निवड श्री विठ्ठल सह. कारखाना कार्यस्थळावर सकाळी 11 वाजता सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत चेअरमन पदाची निवड करण्यात येणार आहे.



 कारखान्याच्या चेअरमनपदी कै.आ.भारतनाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड होण्याची सर्व सामान्य जनतेतून शक्यता व्यक्त होत असून संचालकांनी सुद्धा कै. मग.भारतनाना यांच्या नंतर भगीरथदादा यांचीच चेअरमनपदी निवड व्हावी, अशी ईच्छा व्यक्त केल्याने भगीरथ भालके यांचीच निवड होण्याची शक्यता आहे.


 पदाच्या निवडीसाठी सर्व संचालकांना या निवडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. नूतन चेअरमन पदासाठी कुणा कुणाची वर्णी लागेल याकडे विठ्ठल परिवारासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget