वृत्तसंस्था // प्रतिनिधी
स्व. भारतनाना भालके यांच्या अकाली निधनाने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघामध्ये कधीही न भरुन निघणारी पोकळी झाल्याचे सुतोवाच संत दामाजी कारखान्याचे चेअरमन श्री समाधान आवताडे यांनी केले. संत दामाजी कारखान्यावर स्व. भारतनाना भालके यांना श्रध्द्ांजली वाहण्यासाठी आयोजीत शोकसभेमध्ये ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले कालच्या २८ तारखेला त्यांच्या निधनाची बातमी समजली. खरं तर आपल्यातून सोडून जाण्याचे त्यांचे वय नव्हते. परंतु नियतीपुढे आपण हतबल असतो. राजकारणाच्या पलिकडे जावून त्यांच्याशी माझे वैयक्तीक संबंध होते. निवडणुका लढलो परंतु आम्ही एकमेकांवर वैयक्तीक टिका-टिपण्णी कधीच केली नाही. राजकारणावेळी राजकारण केले. सामाजीक, राजकीय अथवा सहकार क्षेत्र असो यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे भालके कुटुंबावर दुखाचा मोठा आघात झाला आहे. त्यातून सावरण्याचे बळ परमेश्वराने त्यांना द्यावे अशी प्रार्थना कारखान्याचे सभासद,शेतकरी,कर्मचारी यांच्या वतीने श्री पांडूरंग व संत दामाजी पंतांच्या चरणी करतो असे शेवटी आवताडे म्हणाले.
याप्रसंगी श्रध्द्ांजलीपर मनोगत व्यक्त करताना संचालक सचिन शिवशरण म्हणाले, स्व. भारतनानांची भूमिका ही सर्वसामान्यांना न्याय देण्याची होती. जिल्हापरिषदेत आम्ही सत्तेत असतानाही लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांचे लेटरहेडचा आम्ही आदर केला.
कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री झुंजार आसबे मनोगतामध्ये म्हणाले, स्व।भारतनाना भालके यांच्या राजकारण, समाजकारण याविषयी बोलावे तेवढे कमीच आहे. मी विठ्ठल साखर कारखान्यावर शेती अधिकारी म्हणुन सेवेत असताना त्यांचा जवळचा संबंध आला होता. स्व. नानांच्या आत्म्यास शांती लाभावी अशी प्रार्थना त्यांनी शेवटी केली.
कामगार संघटणेचे अध्यक्ष श्री विठ्ठल गायकवाड यांनीही दामाजी कारखान्यावर सत्तेत असताना कामगारांच्या अडचणी समजुन घेवुन स्व.भारतनाना यांनी थोडयाफार प्रमाणात सोडविल्या होत्या.
या श्रध्द्ांजलीपर शोकसभेसाठी कारखान्याचे संचालक राजेंद्र सुरवसे, लक्ष्मण जगताप, राजीव बाबर, बसवेश्वर पाटील, मारुती थोरबोले, सचिन शिवशरण, संजय पवार यांचेसह प्रमोदकुमार म्हमाणे, भारत निकम तसेच पंचायत समितीचे मि।सभापती सुधाकर मासाळ, माजी सभापती प्रदिप खांडेकर, सदस्य लक्ष्मण मस्के, धनंजय पाटील गुरुजी,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, माजी संचालक अशोक माळी, लेबर फेडरेशनचे सरोज काझी, एम।एस।सी।बँक प्रतिनिधी शितोळेसोा, विनोद लटके, शाम पवार, बिभीषण बेदरे, दगडू सुतार, कामगार संघटणा, पतसंस्थेचे पदाधिकारी,सर्व खातेप्रमुख,सभासद, शेतकरी,कर्मचारी,ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, सिझन कामाचे ठेकेदार उपस्थित होते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.