महाळुंग ग्रामपंचायत निवडणूक कोणीही लढवणार नाही - ग्रामस्थ महाळुंग (श्रीपूर) यांचा निर्णय

 



निवडणुकीचा फॉर्म भरणार नाही, नगरपंचायत निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर करा. - ग्रामस्थ


सोलापूर // प्रतिनिधी 

माळशिरस येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झालेली आहे. परंतु महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत होण्याचा निर्णय झालेला आहे. अशा ठिकाणी सध्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात याव्यात अशा प्रकारचा पत्रव्यवहार राज्य सरकारकडून, निवडणूक आयोगाला करण्यात आलेला आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही आदेश संबंधित ग्रामपंचायतींना केलेला नाही. यामुळे संपूर्ण गावामध्ये नगरपंचायत? की ग्रामपंचायत? निवडणूक असा मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. 



जर आता ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली तर राज्य शासनाला, गावाला मोठा आर्थिक निवडणुकीसाठी खर्च होणार आहे. सर्वांचा वेळ वायफळ जाणार आहे. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून गावातील सर्व नागरिक, सर्व पार्टी प्रमुख यांनी एक मताने महाळुंग यमाईदेवी मंदिर प्रांगणात सर्वांच्या उपस्थिती मध्ये ठराव केलेला आहे व निवेदन तयार केलेले आहे सदर निवेदन निवडणूक अधिकारी माळशिरस व उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना दिले आहे.


याबाबत काही वैचारिक मतभेद देखील झाले, पण ज्येष्ठांकडून त्यांच्या समजुती काढण्यात यश आले. सध्या ग्रामपंचायत निवडणूक न लढविण्याचा तसेच या बाबतचा निवडणूक फॉर्म न भरणे असा गावाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे. पहिल्यांदाच गावच्या हिताचा निर्णय घेतल्यामुळे इतर ठिकाणी अशी परिस्थिती आहे तिथं चांगला संदेश जाणार आहे.


सदर बैठकीला रामचंद्र सावंत-पाटील, संभाजी जाधव, भीमराव रेडे-पाटील, नानासाहेब मुंडफणे, अनिल सज्जनराव जाधव, राहुल रेडे, सुभाष जाधव, दिलीप रेडे, रावसाहेब सावंत-पाटील, विजय भोसले, दत्तात्रय मुंडफणे, अरुण पवार, मौला पठाण,  देविदास काळे ,राजकुमार शिंदे, सुहास गाडे, रमेश देवकर, अशोक रेडे पाटील, सुरेश गुंड पाटील, सतीश लांडगे, अरुण तोडकर, मोहन भोसले, ज्ञानेश्वर मुंडफणे, राजेंद्र वाळेकर, बंडू काळे, सोमनाथ मुंडफणे, महावीर शहा, आसिफ शेख, मदन भगत, संजय भगत, नितीन रेडे, लालासाहेब रणशिंगे, रमेश शिंदे, सचिन रेडे, सुदाम यादव, चंद्रकांत सूर्यवंशी, विष्णू जाधव, चंद्रकांत खंडागळे, दत्तात्रेय लाटे, सदाशिव मुंडफणे,  दादासाहेब लाटे, शिवाजी रेडे, राजेंद्र शिंदे, किरण रेडे, सागर यादव,शब्बीर डांगे, मारुती रेडे, भारत काळे, विष्णुपंत रेडे पाटील, एकनाथ चव्हाण, संजय मुंडफणे, धनंजय कुरडे, अनिकेत मुंडफणे,तानाजी जाधव, नितीन रेडे, जाकीर डांगे, संभाजी मारुती जाधव, शामराव भोसले, बाबा जाधव, नितीन पाटील, रघुनाथ पांढरे, सलीम डांगे, अमोल चोपडे, बळीराम भोसले, शंकर जगताप, सुभाष सरतापे, नागनाथ भोसले, जगन्नाथ कदम, आप्पा जाधव, प्रताप मुंडफणे-पाटील, राजू राणे, भगवान जाधव, संभाजी चव्हाण, सतीश पाटील, दत्तात्रय यादव, ज्ञानेश्वर काटे, राजकुमार हाके, भारत मुंडफणे, मोहनदादा रेडे, सदाशिव रेडे, सुभाष मस्के, प्रशांत कुलकर्णी, महादेव जाधव, लालासाहेब रेडे,महादेव चव्हाण, मानसिंग रेडे, नवनाथ भगत, दत्तात्रय जाधव ,रघुनाथ काटे, याबरोबर सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget