दत्तात्रय लिगाडे कोरोना महायोद्धा पुरस्कार ने सन्मानित




सोलापूर // प्रतिनिधी 

जगात देशात राज्यात व सोलापूर शहरात कोरोना या जागतिक रोगाने थैमान घातले असून या जीवघेण्या आजाराला रोखण्यासाठी, केंद्र सरकार, राज्य सरकार  महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असून  या रोगाने अनेकांचे बळी गेले असून  रोगाचा वाढता प्रादुर्भाव कमीकरण्यासाठी संचार बंदी लॉक डाऊन सारख्या प्रभावी अस्त्राचा वापर करण्यात आला याच काळात *सर्वसामान्य माणसाचा माणुसकीचा आधार* तर *बेकायदेशीर धंदे करणाऱ्या गुंडाचा कर्दनकाळ* म्हूणन आगळी वेगळी ओळख असणारे सध्या बेगमपेठ पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांनी कोरोना संक्रमण काळात केंद्र सरकार राज्य सरकार ने कोरोना रोगाबाबत जनतेला दिलेले आदेश निर्देश, सूचना बाबत सर्वसामान्य माणसामध्ये जनजागृती करून कोरोना पासून दूर राहण्याबाबत आपल्या भागात वेळोवेळी फिरून जनतेला दिलासा दिला असून कोरोना जीवघेणा आजार असताना देखील आपले कुटुंब बाजूला सारून राष्ट्रीय कर्त्यव्य म्हूणन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लीगडे यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली असून विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेमणूक असताना पोलीस उप निरीक्षक लिगाडे यांनी अनेक बेकायदेशीर धंदे करणाऱ्या इसमांच्या मुसक्या आवळून अनेक किचकट गुन्हे उघडकीस आणून अनेकांना गजाआड केले होते तसेच कोरोना काळात जीवाची बाजी लावून आपली सेवा चोखपणे बजावली होती   याच उत्तम कार्याची दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समिती वतीने पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांना कोरोना महायोद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे

पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांना बेगमपेठ पोलीस चौकीत सन्मान पत्र, पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून जेष्ठ पत्रकार आन्सर तांबोळी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला

या सत्कार ला उत्तर देताना पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांनी कोरोना काळात अतिशय कठीण व बिकट परिस्थिती असताना केलेल्या सेवेची माहिती देऊन कोरोना महायोद्धा पुरस्कार दिल्याने पत्रकार सुरक्षा समितीच्या सदस्यांचे व पदाधिकारी यांचे आभार मानले आहे

यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे शहर अध्यक्ष अरुण सिदगिड्डी संपर्क प्रमुख वैजिनाथ बिराजदार  आरिफ शेख, अक्षय बबलाद, बिपीन दिड्डी, प्रसाद ठक्का, इस्माईल शेख,इम्तियाज अक्कलकोटकर, मोहंमद इंडिकर, सतीश गडकरी, प्रदीप पेंदापल्लीवार, भास्कर माचन, अंबादास साने, शाहरुख तांबोळी, हबीद तांबोळी, फारुख तांबोळी इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget