स्व. भारत (नाना) भालके हे आम्हा सर्व साखर कारखान्याच्या चेअरमनांचे कॅप्टन होते.खा:-धनंजय महाडिक




 सोलापूर // प्रतिनिधी

भीमा कारखाना येथे भारत नाना भालके यांना श्रद्धांजली वाहण्याच्या  कार्यक्रमाप्रसंगी  भीमा कारखान्याचे चेअरमन श्री  धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक असे म्हणाले की; भारत नानांचे आणि भीमा परिवाराचे गेल्या पंचवीस वर्षापासून अतूट नाते आहे .संपुर्ण साखर कारखानदारी समोरील अडचणीमुळे नानांचा जीव गेला ही संग्राम चव्हाण सरांनी मांडलेली वस्तुस्थितीच असून भारत (नाना) गेले आठ महिने झाले आमच्यासोबत कारखान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांच्या सारख्या मुंबई मंत्रालयाच्या वाऱ्या व्हायच्या. आम्हा सगळ्या साखर कारखान्याच्या चेअरमनांच्या टीमचे भारत (नाना) कॅप्टन होते.या प्रवासादरम्यान त्यांना कोरोना सारख्या असाध्य रोगाने गाठले.विठ्ठल कारखान्याचे समोरील अडी-अडचणी सोडवण्यासाठी भारतनाना अहोरात्र प्रयत्नशील होते. आणि त्याच ओढीने ते हॉस्पिटलमधून डॉक्टरांची परवानगी नसताना सुद्धा स्वतः घेऊन डिस्चार्ज घेऊन गडबडीने निघून आले. आणि कामाच्या व्यापात दोनच दिवसात त्यांची प्रकृती पुन्हा अस्वस्थ झाली व त्यांना पुन्हा रुबी हॉल मध्ये ऍडमिट करावे लागले आणि त्यातच त्यांचं दुःखद निधन झालं. म्हणून समोरील समस्यांमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं हे बलिदान व्यर्थ जाणार नाही.भीमाची निवडणूक लढवायची हा त्यांचा आग्रह होता. भीमा परिवाराला भारत नानांची कल्याणरावांची भक्कम साथ होती. म्हणून आपण भिमाची निवडणूक जिंकू शकलो.भीमा,विठ्ठल आणि चंद्रभागा हे तीनही परिवार एका विचाराने काम करत आहेत.आणि या तिन्ही परिवारांचा भारत नाना आधार होते. मार्गदर्शक होते. तो आधारवड आज हरपला आहे .सामान्यातल्या सामान्य माणसाचाही नाना फोन उचलायचे आणि त्याला आस्थेने बोलायचे हे नानांचा वैशिष्ट्य होतं. कारखान्यांच्या प्रश्नाबाबत नाना सहकारी सहकार मंत्र्यांनाही अधिकारवाणीने पण ठणकावून बोलताना मी स्वतः नानांना पाहिले. मंगळवेढ्याचा अनेक वर्षांचा शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडवताना नानांनी स्वतःची आमदारकी पणाला लावली होती.सरकारवर दबाव आणून सरकारवर आणून नानांनी  सदर पाणी-प्रश्न मार्गी लावला. नानांच्या जाण्याने फक्त भीमा परिवारातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली यावेळी बोलताना श्री महाडिक यांनी नानांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाचे कौतुक करताना "एक नूर आदमी दसनूर कपडा और सौ नूर दाढी "असे कौतुकोद्गार काढले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप व त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ, विश्वराज महाडिक,प्रा.संग्राम चव्हाण, सज्जन पवार, नानासाहेब पवार ,भारत पाटील, माणिक बाबर, डॉ. शैलेश बाबर ,रणदिवे आप्पा ,संजय यादव, बापूसाहेब चव्हाण, जाकीर मुलानी, पैलवान अन्सार, भाऊसाहेब जगताप, बापूसाहेब जाधव, दिलीप उर्फ अनंता रामहरी रणदिवे, दादा नाशिकेत शिंदे, टेकाळे दत्ता गवळी ,अनिल गवळी  बापूसाहेब चव्हाण, सर्व सभासद अधिकारीवर्ग वाहन मालक उपस्थित होते.


साखर कारखानदारी पुढील समस्यांमुळे भारत नानांचा जीव गेला, बलिदान व्यर्थ जाणार नाही!

कै .भारत नाना यांचा भीमा परिवाराचे जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा होता.नानांसारखा लढवय्या नेता घडण्यासाठी तीस - तीस वर्षांचा कालावधी लोटत असतो. असा चौफेर बाजून घडलेला अष्टपैलू नेता जेव्हा अचानक तुम्हाला आम्हाला सोडून जातो तेव्हा ती समाजकारणाची राजकारणाची तसेच अर्थकारणाची सुद्धा मोठी हानी असते. साखर कारखानदारी पुढील समस्यांमुळे नानांचा जीव गेला.त्यामुळे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांनी नानांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ न देण्यासाठी पुढील उपाय योजना केल्या पाहिजेत.नानांची आठवण आम्हा सर्व भीमा परिवाराच्या सदस्यांच्या मनात सदैव तेवत राहील.


- प्रा. संग्राम चव्हाण, (संघटक समन्वयक, भीमा परिवार) सोलापूर

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget