(अन्यथा मी कायदेशीर कारवाईचा बडगा उचलणार:- सूर्यकांत कोकणे)
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
ऊस वाहतूक करताना बेजबाबदार व हायगयीणे वाहन चालवून स्वतः सह इतरांच्या अपघाताला कारणीभूत होऊ नका, अपघातात जीव गेल्याने कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते याचे भान ठेवून वाहतूक करावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी टाकळी सिकंदर येथे ऊस वाहतूकदारांना मार्गदर्शन केले.
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर, सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे जिल्हा वाहतूक शाखा व मोहोळ पोलीस ठाणे यांच्या वतीने ऊस वाहतूक चालकांना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे म्हणाले की, अपघात रोखता येऊ शकतात तरीही अपघाता कडे दुर्लक्ष व खुनासारख्या घटनेकडे आतुरतेने पाहिले जाते हे दुर्दैव आहे.
अपघातात माणूसाच्या मृत्यूनंतर त्या अपघातातील व्यक्तीच्या संसार उघड्यावर पडतो अशा उघड्यावर येणार्या कुटुंबीयांच्या वेदना वाहनचालकांनी समजून घ्या. यासाठी काळजीपूर्वक वाहन चालवून होणारे अपघात व मृत्यूंपासून स्वतःला वाचवा असे आव्हान त्यांनी केले.
या कार्यक्रमावेळी कारखान्याचे चेअरमन मा. खासदार धनंजय महाडिक, प्रा. संग्राम चव्हाण सर,जिल्हा वाहतूक शाखेचे पो. नि. सूर्यकांत कोकणे,पो.नि.सायकर , कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, सर्व पदाधिकारी , कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कर्कश आवाजात टेप रेकॉर्डर लावणे, ट्रिपल ॲक्टर चा वापर न करणे, क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक, अति वेगवान नियंत्रण वाहन चालविणे तसेच ऊस वाहतूकदारांनी मध्य पण करून बेजबाबदारपणे वाहन चालविणे, या सर्व गोष्टी नियमबाह्य व अपघातात कारणीभूत ठरणाऱ्या आहेत. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याच्या इशाराही त्यांनी यावेळी दिला. वाहन चालविताना ताशी 10 किलोमीटर वेगमर्यादा ठेवावी, प्रवासादरम्यान अचानक वाहन नादुरुस्त झाल्यास शक्यतो रस्त्याच्या बाजूला वाहन घ्यावे, मोबाईल हेडफोन व कर्णकर्कश आवाजात गाणी वाजविणे, या सर्व बाबी अपघाताला निमंत्रण देणारे आहेत. यासाठी वाहनचालकांनी काळजी घ्यावी अन्यथा नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईस सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
- सूर्यकांत कोकणे, पोलीस निरीक्षक



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.