मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रामभाऊ गायकवाड यांना पोलिसांनी घेतले ताब्यात




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

मुंबई येथे सोमवार दि 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक रामभाऊ गायकवाड यांना रोपळे  येथील कार्यक्रम वरून जात असताना ताब्यात घेण्यात आले. 

 मुंबई येथे 14 डिसेंबर रोजी मराठा समाजातील विद्यार्थी त्यांचे  असणारे प्रश्न, मराठा आरक्षण याबाबत अधिवेशनातील प्रत्येक आमदारास भेटून निवेदन  देण्याची मोहीम आखण्यात आली होती. यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना होणार होते. या मोर्चेची आक्रमकता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली. रामभाऊ गायकवाड हे  पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे कार्यक्रमासाठी आले असता. पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर व पोलीस कर्मचारी यांनी रविवार दिनांक 13 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रामभाऊ गायकवाड  यांना रोपळे बस स्थानक येथून ताब्यात घेतले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget