(कांतीलाल नाईकनवरे यांच्या अथक प्रयत्नामुळे भराव टाकण्याचे काम पूर्ण)
सोलापूर // प्रतिनिधी
पटवर्धन कुरोली येथील बंधाराला पडलेल्या खड्ड्याला भराव टाकण्याचे काम सद्यस्थितीला युद्धपातळीवर सुरू असून यामुळे पटवर्धन कुरोली ते पिराची कुरोली जाणाऱ्या सर्व दुचाकी व सर्व शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना याची चांगल्या प्रकारे सोय होणार आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिनांक 19 डिसेंबर रोजी करकंब येथील भीमा विकास विभागाच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते या निवेदनामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता की पटवर्धन कुरोली ते पिराची कुरोली हा बंधारा अतिवृष्टी व सातत्याने होणाऱ्या पाण्यामुळे पूर्णपणे खचला असून दोन्ही बाजूला बेसुमार खड्डे पडले होते. यामुळे सर्व ग्रामस्थांना या बाजूकडून त्या बाजूला जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता याची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी/ व पट कुरोली शाखाध्यक्ष कांतीलाल नाईकनवरे यांनी तातडीने याची दखल घेत उपविभागीय अधिकारी करकंब यांना अर्ज सादर करून याची दखल घेण्यास भाग पाडले आहे. यामुळे येथील सर्व ग्रामस्थांचा फार मोठ्या प्रमाणात प्रश्न सुटला आहे त्याचबरोबर हे काम सद्यस्थितीला चांगल्या पद्धतीने पूर्ण झाले असल्याचे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पटवर्धन कुरोली शाखाध्यक्ष कांतीलाल नाईकनवरे यांनी सांगितले.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.