व्यंकटराव भालके यांनी बांधलेली मोट आ.भारतानानाच्या हॅट्रीकलाही धावली!

 


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

मागील 2009 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे फेररचनामध्ये पंढरपूर विभागातील22गावे आणि मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील सर्व गावांचा समावेश करण्यात आला होता.त्यापूर्वी2004 साली संपूर्ण पंढरपूर तालुक्याचा समावेश या मतदारसंघात होता. त्यावेळेपासून आपण आमदार होऊन विठ्ठल परिवाराला आमदारकी मिळवून द्यायची एवढा निश्चय मनात ठेवून ती निवडणूक सेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आ भालके यांनी लढविली होती. परंतु त्या निवडणुकीत चक्क तिसऱ्या क्रमांकाची मते मिळून पराभव पत्करावा लागला होता.

अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे समजून आ. भरतानाना भालके यांनी बदललेली मतदार संघाची रचना विचारात घेऊन आता आपणाला पंढरपूर बरोबर मंगळवेढा तालुक्यातील जनतेला आपली ओळख निर्माण करून द्यावी लागणार म्हणून त्यांनी अगदी मतदार संघाची फेररचना झाल्यापासून मंगळवेढा भागात आपले दौरे वाढवले होते. आपल्या या स्वतःच्या दौऱ्यात प्रत्येकाला भेटता येत नसते म्हणून त्यांनी त्यांचे पुतणे आणि जि. प चे माजी सदस्य व्यंकटराव भालके यांच्याकडे मंगळवेढा तालुक्यातील लोकांचा संपर्क वाढविण्यासाठी जबाबदारी टाकली होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच अनेक वर्ष ही जबाबदारी व्यंकटराव भालके यांच्याकडे देण्यात आल्यामुळे त्यांनी या भागातील सर्व गावे आणि सर्व गावातील सुख आणि दुःखात आपली  आवर्जून हजेरी लावत घराघरातील मतदार ओळखिचा करीत आ. भारतानानाचे नाव ही घराघरात पोहचविले होते.

2009 पूर्वी व्यंकटराव भालके यांनी अगदी सकाळी लवकर जाऊन दिवसभर अनेक ठिकाणी जाऊन अनेकांच्या घरचा चहापाणी ,आणि गप्पा ठप्पा मारीत आपुलकी निर्माण केली होती. अशा भक्कम तटबंदी केलेल्या मंगळवेढा तालुक्यातील लोकांना ऐनवेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीने त्या भागातील नेत्यांना मात्र मोठा अडथळा झाल्यासारखं वाटले होते. परंतु याच वेळी व्यंकटराव भालके यांनी केली माणुसकीच्या धोरणातून केलेली फिट बांधणी एवढी मजबूत होती, की त्या भागातील नेते मात्र विजयदादाच्या प्रचारात सामील झाले असले तरी मतदार मात्र भालके यांनीअडचणीत वेळोवेळी केलेल्या मदतीला जागून नेत्यांचे जाणे किरकोळ मानून भालके यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यावेळी फार मोठे मताधिक्य मिळाले होते.

त्यानंतर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर भरतानाना हे सर्वसामान्य नागरिकाला सहज भेटू शकणारा आमदार म्हणून ओळख झाली. त्यांनतर मंगळवेढेकर जनतेने स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये गट मजबूत करीत भारतानानाच्या गटाचे दामाजी सह साखर कारखान्यावर संचालक मंडळ ही निवडून दिले.

हा सर्व प्रकार पाहता यामध्ये आ भारतानाना भालके यांना सलग तीन वेळा निवडून देत ही मंगळवेढा ची जनता खंबीरपणे पाठीशी राहून विजयाची हॅट्रिक पूर्ण केली .या सर्व गोष्टीला व्यंकटराव भालके यांनी जपलेले संबंध हेच कारणीभूत होते .हे मात्र आ. भरतानाना भालके यांनाही पटले होते. अजूनही आ भालके यांच्यानंतरही भालके कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे याच भागातील जनतेने उभे राहण्याचा जो निर्णय घेतला आहे. तो निर्णय म्हणजेच आ. भरतानाना यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget