राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी व आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवस निमित्त युवक काँग्रेसचे गणेश सांळुखे यांच्या वतीने रक्तदान शिबीर




सोलापूर // प्रतिनिधी 

अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षा खासदार सोनिया गांधी व आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवस निमित्त सोलापुर शहर युवक काँग्रेसच्या युवा प्रेरणा सप्ताह अंतर्गत छत्रपती प्रतिष्ठाण अध्यक्ष, परिवहन सदस्य गणेश सांळुखे यांच्या वतीने सुनील नगर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्द्घाटन युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, मध्य विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष योगेश मार्गम, बाबूराव क्षीरसागर, विश्वास गज्जम, शाहु सलगर श्रीनिवास परकीपंडला आदि प्रमुख उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरात 118 नागरिकांनी रक्तदान केले रक्तदात्यांना पाण्याचे झार व कुकर भेटवस्तू म्हणुन देण्यात आले.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सतीश धोत्रे, सचिन कोळी, सूरज धोत्रे, मनोज सावंत, नीलेश माळी, अण्णा लोहार, आदर्श देशमुख, तात्या थोरात, विशाल कोपुल, शुभम चव्हाण, सुनील आकुले, मच्छी शेख, सिद्राम लिम्बोळे, उमेश लिम्बोळे यांच्यासह इतरांनी सहकार्य केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget