लोहा तालुका प्रशासनातील अधिकारी आणि रेती माफिया यांचे संबंध आता कागदपत्रावरून चव्हाट्यावर आले आहेत जप्त केलेल्या मोजणी भूमी अभिलेख कार्यालयातील अभियंत्यांनी केली असता अहवाल तहसील कार्यालयात पाठवला होता, परंतु तहसील कार्यालयातून या अहवालातील 800 ब्रास रेतीची कागदपत्रे नसल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर संशय व्यक्त झाला आहे.शासनाच्या तिजोरीला भगदाड पडले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे सर्रास दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
संपूर्ण जिल्हाभरातील रेती घाटांचे महसूल प्रशासनाने लिलाव केला नसतांनाही लोहा तालुक्यातील येळी घाटातून रेती माफियांनी रेतीचा अवैध उपसा करुन विविध ठिकाणी रेतीसाठे केले होते. यावर तक्रारीनंतर तहसील कार्यालयाने हा रेती साठा जप्त केला. नियमानुसार तालुका भुमी अभिलेख कार्यालयातील अभियंत्याकडून या रेतीसाठ्याची पंचांसमक्ष ईटीएस मोजणी करण्यात आली होती. त्यावेळी हा रेती साठा२४५५ब्रास असल्याचे स्पष्ट झाले. घाटालगतच्या शेतात व अन्य ठिकाणी साठा करण्यात आला होता.तसा मोजणीचा सविस्तर अहवाल भुमी अभिलेख कार्यालयाने 3 जुलै 2019 रोजी तहसील कार्यालयास पाठवला होता. परंतु तहसील कार्यालयातील 22 ऑगस्ट 2019 च्या रेकॉर्ड नुसार केवळ 1662 ब्रास रेती साठा उपलब्ध असून त्यातील कागदपत्रातून सुमारे 793 ब्रास रेती गायब झाली आहे. परंतु एका जबाबदार अधिकाऱ्यांनी सदरील रेती साठा गावठाण जमीनीतील असून तो चोरीला गेले असल्याची कबुली दिली. उर्वरित शिल्लक रेती साठा हा खाजगी जमीनीवरील असून तो अजूनही असल्याची कबुली दिली. कारण ही बाब मान्य करण्यासारखी नाही. कारण त्या ठिकाणी एकही ब्रासही रेती शिल्लक नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
घाटातील रेतीचा अवैद्य उपसा करून तो चोरट्या मार्गांनी गरजवंतांना चढ्या दराने विक्री केला जातो अशा चोरलेल्या रेतीवर तालुका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. गौणखनिज विभागाने 4175 रुपये प्रति ब्रास दर निश्चित केला असून चोरलेल्या रेतीवर या दराच्या पाचपट दंड आकारला जातो. ही रक्कम 20875 होते.या रक्कमेवर स्वामीत्वधनाच्या पाचपट रक्कम म्हणजेच दोन हजार रुपये प्रतिब्रास रक्कम वसूल केली जाते. यानुसार एक ब्रास रेतीवर 22875 रूपये दंड आकारला जातो. त्यांचा 793 ब्रास रेतीवर एकूण 1 कोटी 840लाख रुपयांचा दंड होतो. परंतु शीर येत असेल तर त्याचा रेकॉर्डवरून गायब करण्यात आली असल्याने शासनाच्या तिजोरीला करोडो रुपयांचे भगदाड पडले असून याची जबाबदारी घेण्यास तहसील कार्यालयातील अधिकारी तयार नसले तरी त्यांच्या परवानगीशिवाय या रेतीची चोरी होऊ शकत नाही.चोरीला गेलेला रेतीसाठा हा गावठाण जमीनीवरील होता असे गृहीत धरले तरी तो रेतीसाठा रेकॉर्डवर का घेतला गेला नाही,असा प्रश्न विचारला जात आहे.
अद्याप दहा दिवस उलटले तरीही तरी युरी घाटातून महसूल प्रशासनाला चुकवून पळून गेलेल्या टिप्परची उस्माननगर पोलिस ठाण्याने एम एच 26एच8883 आणि एम एच 04 डी7679या टिप्पर विरूद्ध गुन्हा 3 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करूनही अद्यापही पोलिसांना दोनही टिप्पर सापडले नाहीत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.