जाणता राजा,८० वर्षाचा तरुण खासदार मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष.राष्द्रवादी काँग्रेस पार्टी,मा.केंद्रीय कृषीमंत्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शरद गोविंदराव पवार हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. इ.स. १९७८ ते इ.स. १९८०, इ.स. १९८८ ते इ.स. १९९१ व इ.स. १९९३ ते इ.स. १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
जन्मतारीख: १२ डिसेंबर, १९४०
जन्मस्थळ: बारामती
शिक्षण: बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय
आधीची पदे: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री १९९३–१९९५त्यानंतर १० जून इ.स. १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली. इ.स. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.
इ.स. २००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. २२ मे इ.स. २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. २९ मे इ.स. २००९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. जुलै इ.स. २०१०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली. इ. स्. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला ५२ जागा मिळाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा सहभाग होता.
जाणता राजा,८० वर्षाचा तरुण खासदार मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष.राष्द्रवादी काँग्रेस पार्टी,मा.केंद्रीय कृषीमंत्री यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.