सोलापूर // प्रतिनिधी
येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस- कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला मध्ये ऑनलाईन मुलाखतीद्वारे तब्बल २३ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगणगौडर यांनी दिली.
या ऑनलाईन मुलाखती यशस्वी ग्रुप पुणे व कोल्हापूर नीम ट्रैनी स्कीम अंतर्गत घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या कंपनीमध्ये कॉंटिनेंटल इंडिया, मंत्री मेटॅलिक, अँफिनॉल इंडिया, एलकॉम इंडस्ट्रीज, भारत फोर्ज आणि रेमंड या होत्या. या सर्व कंपनीचे एच. आर.यामध्ये श्री. नितीन तेटे, श्री. सी. एस. कोडे व इतर सहकारी उपस्थित होते. यामध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन मुलाखत घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.
सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी अभिनंदन केले.यावेळी कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर.बी. शेंडगे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. या निवडीकरिता ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा व त्यांची पूर्ण टीम यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.