कोरोनामुळे खर्डीचा सद्गुरु सिताराम महाराज पुण्यतिथी उत्सव रदद




सोलापूर // प्रतिनिधी 

तालुक्यातील खर्डी येथील श्री सद्गुरु सिताराम महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आणि वार्षिक यात्रा यंदा कोरोनाच्या सावटामुळे रदद करण्यात आला आहे. त्यामुळे भक्तांनी 12 ते 14 डिंसेबर दरम्यान खर्डीत येउ नये. या काळात मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खर्डीत ग्रामस्थांकडून जनता कर्फ्यु पाळला जाणार असल्यांची माहीती खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक यांनी दिली आहे.यावेळी सरपंच रमेश हाके , सदगुरु श्री सीताराम महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष दीपक रामचंद्र रोंगे व ग्रामस्थ उपस्थित होते .


    सद्गुरु सिताराम महाराज देवस्थान हे पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्हयातील एक जागृत देवस्थान आहे. श्री सद्गुरु सिताराम महाराज यांची 13 डिंसेबर रोजी पुण्यतिथी आहे. प्रतिवर्षी पुण्यतिथील खर्डीत मोठा उत्सव आणि यात्रा भारत असते. यंदा कोरोनाच्या सावटामुळे सदरचा उत्सव साधेपणाने मंदिरात केवळ विधिवत पुजाअर्चा आणि नित्योपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात इतर भक्तांना कुठल्याही प्रकारे दर्शन मिळणार नाही. तथापि मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी सिताराम महाराजांच्या भक्तांनी 12 डिंसेबर ते 14 डिंसेबर पर्यत खर्डी येथे येउ नये. असे आवाहन ग्रामस्थ तसेच सिताराम महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.


 विशेष म्हणजे , खर्डीतील उत्सवा दरम्यान खर्डी ग्रामस्थांनी देखिल मंदिर परिसरात गर्दी करू नये. यासाठी तीन दिवसाच्या काळात जनता कर्फ्यु पाळण्याचा देखिल निर्णय घेण्यात आला आहे.


   जगभरासह देशभरातील कोरोनाचा संसर्ग अटोक्यात येत आहे. अशातच दुस-या लाटेची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर खर्डी गावामध्ये उत्सवादरम्यान गर्दी जर झाली. तर निश्चितच ग्रामस्थ तसेच येणा-या भक्तांमध्ये संसर्गाचा फैलाव होउ नये. यासाठी सदरचा निर्णय घेण्यात आल्यांचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget