कारखान्यांना जाग करण्यासाठी हलगी नाद आंदोलन करणार:शंभू साठे

 


ऊस बिलाची रक्कम एफआरपी प्रमाणे एक रक्कमी मिळण्यासाठी माढा शिवसेनेच्यावतीने 9 डिसेंबर बुधवारी माढ्यातील छञपती शिवाजी महाराज चौकात भव्य रस्ता रोको व हलगी नाद आंदोलन माढा शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती माढा शिवसेनेच्या वतीने देण्यात आली.कारखानदारांना जाग येण्यासाठी हलगी घुमणार असल्याची माहिती माढा शहर अध्यक्ष शंभु साठे यांनी दिली.

या संदर्भात माढा पोलिस स्टेशनला निवेदन दिले आहे. सध्या सुरू असलेल्या ऊस गळीत हंगाम सन 2020 /21 मध्ये शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यास गाळपासाठी गेल्या 1ते 2 महिन्यापासून चाललेला आहे. तरी या कारखान्यांनी आपले ऊस दर जाहीर केले नाहीत.

ऊस कारखानदार ऊस गेल्यापासून 14 ते जास्तीत जास्त 20 दिवसाच्या आत बिल मिळणे बंधनकारक आहे. परंतु 2 महिने होत आले तरी कारखान्याने उसाचे बिल शेतकऱ्यांना देण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. सर्व कारखाने हे जाणून- बुजून शेतकऱ्यांची पिळवणूक करून त्यांना त्यांचे घामाचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे माढा शिवसेनेच्या वतीने 9 डिसेंबरला आम्ही रस्ता रोको करणार आहोत. जर कारखानदारांना जाग नाही आली तर याहुनही तीव्र आंदोलन करणार असल्याचे माढा शहर अध्यक्ष शंभु साठे यांनी सांगितले.

या वेळी शंभू साठे, भैय्या खरात, शरद वारगड ,बबन पाटील, समीद सावळे, संदिप पाटील, नाना साळुंखे पाटील योगेश जाधव,बाळासाहेब पवार उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget