महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढवणार.



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पकडलेला ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

यामध्ये मार्च २०२०ते डिसेंबर 2020 पर्यंत सर्व महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीची  निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे यामध्ये वरील कालावधीतील सर्व ग्रामपंचायतीच्या मुदती संपलेल्या आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 18 जानेवारी रोजी त्याची मतमोजणी होणार आहे.


यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना  स्वतंत्रपणे स्वबळावर पॅनल उभा करून मनसेचे दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात येणार आहेत यामध्ये ते पंढरपूर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीचा सहभाग आहे. या सर्व व ग्रामपंचायतीच्या निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवण्यात येणार असल्याचे यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी जाहीर केले.



यामध्ये सर्व गाव गाड्या चा कारभार पाण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक उत्सुक असून मनसेचा झेंडा सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीवर झळकवण्यासाठी सर्व सोलापूर जिल्ह्यातील मनसे सैनिक आता आग्रही ही झालेले आहेत. सर्व ग्रामीण भागांमध्ये आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यास सुरुवात झाली आहे.


 यामध्ये प्रत्येक गावोगावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर मीटिंग घेऊन इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगण्यात येणार असल्याचे यावेळी श्री दिलीप धोत्रे यांनी सांगितले.

यावेळी तालूका अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्ष महेश पवार, विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष प्रताप भोसले व आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget