जात पडताळणी समितीचे कार्यालय सुट्टी दिवशी सुरु राहणार



सोलापूर // प्रतिनिधी 

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याची पोचपावती अर्जासोबत जोडणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय 25, 26 व 27 डिसेंबर 2020 रोजी सुरु ठेवण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त तथा समितीच्या सदस्या छाया गाडेकर यांनी दिली आहे. 

            अधिक माहितीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय व सांस्कृतिक भवन सात रस्ता सोलापूर येथे संपर्क साधावा.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget