वृत्तसंस्था प्रतिनिधी:- पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नावलौकिक असलेले गिरीराज हॉस्पिटलला एन.ए.बी.एच मानांकन प्राप्त झाले असून क्वालीटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI), नवी दिल्ली यांच्या अंतर्गत गिरीराज हॉस्पिटलला एच.सी.ओ (HCO) श्रेणी मध्ये बारामती तालुक्यातील पहिलेच एन.ए.बी.एच (NABH) मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होण्याचा सन्मान मिळाला आहे.
गिरीराज हॉस्पिटल मधील गिरीराज पथ लब ह्या आधीच NABH अधिकृत झालेले आहे.तरी हॉस्पिटल मधील उपलब्ध आंतरराष्ट्रीय दर्जाची विनम्र रुग्णसेवा, रुग्ण सुरक्षा, कुशल मनुष्यबळ, प्रमाणित वैद्यकीय प्रोटोकॉलस, वैद्यकीय आस्थापना, अद्ययावत मशिनरी, उपकरणे परिसर स्वच्छता व एन.ए.बी.एच मानक ह्यांचे परीक्षण NABH QCI च्या परीक्षकांनी समक्ष भेट देऊन गिरीराज हॉस्पिटलला एन.ए.बी.एच मानांकन देण्यात आले सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत आहे.
या संबंधी २४ डिसेंबर रोजी गिरीराज हॉस्पिटल मध्ये झालेल्या अभिनंदन सोहोळ्यात "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा" हे ब्रीद वाक्य अंगीकारून बारामती परिसरातील रुग्णांना आंतराष्ट्रीय दर्जाची सेवा उपलब्ध करून देण्याचा मनोदय गिरीराज हॉस्पिटलचे चेअरमन सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.रमेश भोईटे व सेक्रेटरी सौ.निर्मला (काकी) भोईटे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी सुप्रसिद्ध ह्रुदय रोग तद्न्य डॉ.रमेश भोईटे सर चेअरमन गिरिराज हॉस्पिटल, सौ.निर्मला भोईटे (काकी) सेक्रेटरी गिरिराज हॉस्पिटल श्री.प्रशांत भोसले मुख्य व्यवस्थापक, सौ.अश्विनी जाधव HR, डॉ.राजस गांधी, डॉ.समीर नाग देवते, डॉ.सुजाता चव्हाण, डॉ.स्नेहलता पवार, सौ.प्रभा चेची लॅब प्रमुख, श्री.अप्पा हिँगसे व समस्त गिरिराज हॉस्पिटल कर्मचारी व्रुंद यावेळी उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.