ट्वेंटीवन (21) शुगर्स लि,चा बॉयलर अग्निप्रदिपन सौ.अदिती अमित देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न




लवकरच चाचणी गळीत हंगामाचा प्रारंभ

शेतकऱ्याच्या पदरात अधिकचे माप टाकण्याचा उददेश साध्य करण्यासाठी कायम कटीबध्द राहू :पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख

   साखर उद्योगात सर्वात अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरून लातूर नजीकच्या मळवटी येथे उभारण्यात आलेल्या ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड या प्रकल्पाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ येत्या काही दिवसात होणार असून ज्यांचे हीत साधायचे आहे, त्या शेतकरी वर्गांच्या पदरात अधिकचे माप टाकण्याचा मुख्य उद्देश ठेवून हा प्रकल्प साकारला गेला आहे, तो उददेश साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

   लातूर तालुक्यातील मळवटी येथे उभारण्यात आलेल्या ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड प्रकल्पाचा बॉयलर अग्नीप्रदीपन सौ. अदिती अमित देशमुख यांच्या शुभहस्ते आणि विलास साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई विलासरावजी देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, चि.अविर, चि.अवान यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विधीवत पूजा करून रवीवार दि. ३ जानेवारी रोजी संपन्न झाला. 

   अत्यंत साध्य आणि कौटंबिक कार्यक्रमात पार पडलेल्या कार्यक्रमास विकासरत्न विलासराव देशमुख कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उडगे, कार्यकारी संचालक जे.डी.रणवरे, विलास कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, कार्यकारी संचालक जे.एस.मोहिते, कार्यकारी संचालक ए.आर. पवार, रेणा कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्षमण मोरे, कार्यकारी संचालक सुनिलकुमार देशमुख, संत शिरोमणी मारूती महाराजचे व्हा.चेअरमन श्याम भोसले, ट्वेंटीवन शुगर्स ली. जनरल ॲडमीनस्ट्रेशन व्हा.चेअरमन विजय देशमुख, आणि बीझनेशहेड कौशल पौराना तसेच जनरल मैनेजर अशोक थोरात आदी उपस्थित होते.

   प्रसन्न आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात थोडक्यात मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, ट्वेंटीवन शुगर्स लि. हा प्रकल्प उभारण्याची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांचीच होती, आणि या प्रकल्पाचे नावही त्यांनीच सुचविले आहे. ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडावी, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाचे जीवनमान बदलावे हा उद्देश ठेवून आदरणीय साहेबांनी मांजरा कारखान्याची उभारणी केली. हेतू जनकल्याणाचा असल्यामुळे ईश्वर कृपेने हा प्रकल्प उत्तम चालला आणि आजही चालतो आहे. पूढे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखाना परिवाराचा विस्तार होऊन आता विलास कारखाना युनीट १, विलास कारखाना युनीट २, रेणा कारखाना, जागृती कारखाना, संत शिरोमणी मारुती महाराज कारखाना, ट्वेंटीवन युनिट १, ट्वेंटीवन युनीट २ असा विस्तार झाला आहे. या सर्व कारखान्यात गुणात्मक स्पर्धा सुरू असून ही स्पर्धा ही शेतकऱ्यांचे हीत साधणारी आहे. 

    ट्वेंटीवन शुगर्स युनीट २ हा प्रकल्प नुकताच या परीवरात सहभागी झाला असून परभणी जिल्हयातील सोनपेठ तालुक्यातील साईखेडा येथे असलेल्या या प्रकल्पात चालू गळीत हंगामात २ लाख मेटन पेक्षा अधिकचे गाळप झाले आहे. २५०० हजार मेटन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या प्रकल्पात सदया प्रतिदिन ४ हजार ५०० मेटन ऊसाचे गाळप होत आहे. यामूळे तो कारखाना मांजरा परीवारातील स्पर्धेत उतरला आहे. 

    मांजरा परिवारातील साखर कारखानदारीतील गुणात्मक स्पर्धेतून जे शिकायला मिळाले जे अनुभवता आले त्या सर्वांचा विचार करून ट्वेंटीवन युनिट ०१ ची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी जगातील सर्वात अद्ययावत असलेले तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प उत्तम तऱ्हेने आणि भविष्यात तो एकूण साखर उद्योगासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून नावारूपाला येईल. यातून मांजरा परिवाराची या क्षेत्रात निश्चित उंची वाढेल असा विश्वास पालकमंत्री देशमुख व्यक्त केला. उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पातून गंधक विरहीत साखर तयार करण्यात येणार असून उत्पादीत होणाऱ्या या साखरेला जागतिक पातळीवर मागणी होणार आहे असे त्यांनी सांगितले.

   कोवीड१९ च्या पादूर्भावाची परिस्थिती लक्षात घेऊन्‍ ट्वेंटीवन शुगर्स युनिट ०१ चा शुभारंभ अत्यंत साध्या आणि कौटोबिक वातावरणात पार पडला आहे. आगामी काही दिवसात सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियम पाळून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येईल्‍ असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले. ट्वेंटीवन शुगर्स ली. जनरल ॲडमीनस्ट्रेशन व्हा. चेअरमन विजय देशमुख, आणि बीझनेशहेड कौशल पौराना तसेच जनरल मैनेजर अशोक थोरात व त्यांचे सहकारी त्यादृष्टीने तयारी करतील असे त्यांनी सांगितले.

    मांजरा परिवारातून काही दिवस बाहेर राहिलेला आणि सदया बंद असलेला संत शिरोमणी मारूती महाराज हा कारखाना सुरू करण्याची औपचारीकता पूर्ण झाली असून येत्या दोन महिन्यात मशिनरी दुरूस्तीचे काम पूर्ण होईल आणि तेथे मार्चमध्ये गाळपाला सुरूवात करण्यात येईल. आगामी वर्षात तो कारखाना पूर्ण क्षमतेने चालेल, शिवाय मांजरा परीवारातील कारखान्या सोबत क्षमतेने स्पर्धा करेल असा विश्वासही त्यांनी योवळी व्यक्त केला.

   

या कार्यक्रमास गोविंद देशमुख, विपीन देशमुख, आलोक सेहगल, अनिल महेंद्रकर, नितीन भोयटे, एस.के.तुरे पाटील, एन.आर.मोरे, पी.एस.ठोंबरे, प्रदीप सक्सेना, एफ.बी.येरगणी, सागर मिसाळ, सोमनाथ शिवपुरे, संभाजी रेड्डी, सुपर्ण जगताप, राधेश्याम देशमुख, श्री कल्याणकर, डी.एस.कदम, अनंत पवार, श्रीराम पाटील, मिलींद पाटील मांजरा परिवारातील सर्व संचालक, मेसर्स इजॅकचे क्षिरसागर व सर्व अधिकारी, कर्मचारी, पुरवठादार, उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget