वृत्तसंस्था // प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राईट हॅण्ड असलेले शिवसेनेचे घोटाळेबाज नेते प्रताप सरनाईक यांची टिटवाळा गुरुवली येथील 100 कोटीची 78 एकर जमीन ईडीने जप्त केली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. घोटाळा केलेली 100 कोटीची रक्कम परत न केल्यास सरनाईक यांच्या अन्य मालमत्ताही ईडी जप्त करण्याची कारवाई करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. टिटवाळा गुरुवली येथील जमीनीच्या ठिकाणी भाजप नेते सोमय्या यांनी आज प्रत्यक्ष भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत भाजप माजी आमदार नरेंद्र पवार, शक्तीवान भोईर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. एनईसीएलच्या 100 कोटीच्या घोटाळ्याच्या रक्कमेतून सरनाईक यांनी टिटवाळा गुरुवली येथे 78 एकर जमीन विकत घेतली होती. ही जमीन ईटीने जप्त करण्याची नोटिस 2014 सालीच काढली होती. आत्ता ही जमीन जप्त करण्याची कारवाई ईटीने केली आहे. त्याची नोटीसच सोमय्या यांनी माध्यमांना सादर केली. उद्धव ठाकरे यांचा राईट हॅण्ड असलेल्या घोटाळेबाज सरनाईकच्या विरोधात ठाकरे सरकार काय कारवाई करणार आहे असा खडा सवाल सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला आाहे. 13 हजार गुतंवणूकदारांचे 560 कोटी रुपये सरनाईक यांनी गायब केले आहे. घोटाळ्य़ांसी सरनाईक यांचा थेट संबंध आहे. 100 कोटी रुपये सरनाईक यांनी परत न केल्यास ईडी सरनाईकच्या अन्य मालमत्ताही जप्त करण्याची कारवाई करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.