२२००कि.मी चा सायकल प्रवास करणा-याचा केला सन्मान:- अभिजीत पाटील (पंढरपूरच्या दिगंबर भोसले व सचिन राऊत यांनी केला प्रवास)

 

आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार करण्याचा संकल्प घेऊन वयाच्या ६१ व्या वर्षी श्री. दिगंबर भोसले आणि सहकारी श्री. सचिन राऊत यांनी सायकल वर तब्बल २२००किमीचा प्रवास २५ दिवसात पूर्ण केला आहे. त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरी निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.


रुक्मिणी माता मंदिर, पंढरपूर ते कालिमाता मंदिर, पश्चिम बंगाल असा विविध राज्यांमधून त्यांनी प्रवास पूर्ण केला. आरोग्य पूर्णता, प्रदूषणमुक्त भारत, कोरोना मुक्त भारत याबाबत जनजागृती व्हावी, असाही यामागील उद्देश होता.


त्यांच्या या संकल्पात त्यांना असेच यश लाभत राहो, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्वजण आरोग्यासाठी जागरूक होवोत, हीच विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना अभिजीत पाटील यांनी केली.


यासत्कार प्रसंगी श्री. सागर कदम, श्री. बादले पाटील सर, श्री. राजेश दंडे सर श्री. राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget