सोलापूर // प्रतिनिधी
कै.पै.विष्णुपंत (भाऊ) महाडिक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त ग्रामपंचायत व सोसायटीमध्ये भाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी भाऊचे जिवलग सहकारी असणारे श्री.महादेव बापू बाबर ,माजी सरपंच लक्ष्मण पांढरे माजी ,सरपंच पंडित अण्णा बाबर, प्रगतशील द्राक्ष बागायतदार दिगंबर बाबर ,माजी सरपंच भारत पाटील,शिवाजी शेंडगे, सलीम मुलाणी, संदीप देवकाते , लियाकत मुलाणी पत्रकार बंडू बाबर गणेश वारे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी महादेव बाबर व सलीम मुलांनी यांनी भाऊंच्या जुन्या आठवणीला उजळा दिला. बापू म्हणत होते की भाऊ हे सर्वसामान्यासाठी झटणारे व झिजणारे एक नेतृत्व होते तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे हो गेली चाळीस वर्ष चेअरमन होते भाऊंनी प्रत्येक व्यक्तीला अडल्यानडल्या व्यक्तीला सोसायटीच्या माध्यमातून अनेकांच्या अडीअडचणी दूर करून सर्वसामान्य कुटुंबात न्याय देण्याची भूमिका भावना कायम ठेवली होते भाऊ तुम्ही किती जरी मोठा असला पण तुमचे पाय नेहमी जमिनीवर असायचे .तुमचं मन नेहमी इथल्या सर्वसामान्य कार्यकर्ते बरोबर रमायचं. तिकडं महाडिक घराणे उद्योग क्षेत्रात मोठे जरी असले पण भाऊनी दाखवून दिलं की महाडिक सुद्धा उत्कृष्ट शेती करू शकतात .शेती बगावी तर विष्णुपंत भाऊ ची . भाऊ तुम्ही जे पुळूज गावाविषयी विकासाचा स्वप्न पाहिलं होत पुळूजगाव हे नेहमी प्रगतीपथावर असले पाहिजे ही तुमची भावना होती . माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला पुळूज गावचं सरपंच केले. महाराष्ट्रातल्या सर्वात कमी वयाचा सरपंच करण्याचा मान भाऊ तुम्ही मला दिला आणि तुमच्या विचाराचा मी वारसदार आहेत तुम्ही जरी भाऊ आमच्यापासून निघून गेला तुमचे विचार कधी आमच्यातून निघून जाणार नाहीत तुमच्या विचारांनी पुळूज गावाचा कारभार करून तुमच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा नेहमी गौरव अभिमान तुमचा राहील भाऊ निश्चित तुम्ही जे स्वप्न पुळूज गावा विषयी पाहिलं ते निश्चित मी पूर्ण करीन असे पुळूज गाव चे सरपंच शिवाजी शेंडगे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.