पंढरपूर // प्रतिनिधी
कालच संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे काही ठिकाणी महा विकास आघाडी तर काही ठिकाणी भाजपने तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांची सरशी झालेली पाहायला मिळत आहे.
याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या व प्रतिष्ठेच्या पंढरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक आता उद्या दिनांक 20 जानेवारी रोजी होणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते आहे. या उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी स्थानिक शहर विकास आघाडी कडून उपाध्यक्ष पद मिळवण्यासाठी, त्या पदाला ज्ञाय देण्यासाठी, नागरिकांची सेवा करण्यासाठी अनेक जण इच्छुक असून यामध्ये कोरोना काळामध्ये अत्यंत काटेकोरपणे व अत्यंत शिस्तबद्ध रित्या काम केलेले माजी आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांचे नाव आघाडीवर असून त्यांनी सत्ताधारी परिचारक आघाडीसाठी नगरिक, प्रशासन, लोकप्रतीनिधी यांचे मध्ये समन्वय साधुन नाजुक वेळी टिम वर्क करत अत्यंत महत्त्वपूर्ण भुमीका बजावली. या कोरोना काळातील बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा नागरिकांना चे प्रश्न प्रशासना परियंत पोहचवुन मार्गी लावले.ज्यानी मदत मागीतली ती तळमळीने पुर्ण करण्याचा प्रयत्न केला. याच बरोबर पंढरपूर नगरपालिकेचे पक्षनेते राहिलेले स्वर्गीय सचिन डांगे यांनेही परिचारक आघाडी करीना मागील २५ वर्षापासून महत्वपुर्ण योगदात आहे. त्यांना परिचारक आधाडी व नगरपालिचा यातील दुवा म्हटले जायचे, यांच्या पत्नी श्रीमती सुप्रिया सचीन डांगे यांना ज्ञाय मिळु शकेल असे वाटते तर सौ अर्चना रानगट याही उपाध्यक्ष पदासाठी मागणी करत आहेत , या सर्वांमध्ये एकमत न झाल्यास भाजपाचे नगरसेवक उपनगराध्यक्ष राहिलेले अनिल अभंगराव सर यांना पुन्हा एकदा संधी मिळते की काय असे वाटत आहे किंवा तोडगा म्हणुन पाच,पाच महिन्याकरीता निवड होण्याची शक्यता आसल्याचे समजते.
आघाडीचे प्रमुख सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार प्रशांतराव परिचारक तसेच युरोपियन शुगर चे चेअरमन उमेश मालक परिचारक, प्रणव दादा परिचारक आता काय निर्णय घेतात हे आता उद्या होणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेच्या बैठकीमध्ये समजेल.
आजच पंढरपूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी पंढरपूर येथील नवतरुन होतकरू युवक विजय वरपे, त्याचप्रमाणे शिवाजी अलंकार व जगदीश जोजारे या सर्व तरुण परिचारक प्रेमी कार्यकर्त्यांना नगरपालिकेमध्ये प्रवेश करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सोलापूर जिल्हा विधान परिषद निवडणूक व वर्षाच्या अखेरीस होणारी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार प्रशांतराव परिचारक कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण पंढरपूर शहराबरोबरच संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे उद्या होणार्या पंढरपूर नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये उपनगराध्यक्ष निवडी बरोबरच यातीन वरील स्वीकृत नगरसेवकांच्या सुद्धा निवडी संपन्न होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.