कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही : जयंत पाटील




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते वेगवेगळ्या कारणामुळे सध्या अडचणीत सापडले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर एक महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. तर नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. त्यामुळे विरोधक या दोन्ही प्रकरणात आक्रमक झाले असून दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत

...तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही : जयंत पाटील

या गोष्टींचा आढावा पक्षांतर्गत जरुर घेतला जाईल आणि आवश्यकता भासली तर मुख्यमंत्र्यांशीही याबाबतीत चर्चा करु. तथ्याच्या आधारावर योग्य ती भूमिका घेऊ. कोणीतरी आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही. पण याबाबतीत आम्ही पक्षस्तरावर योग्य तो विचार करणार आहोत. महिला आरोप करते, धनजंय मुंडेंनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. असं असताना धनंजय मुंडेंना कोणीतरी जाणीवपूर्वक ब्लॅकमेल करत असेल आणि त्यात त्यांचा दोष नसेल तर राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

नवाब मलिक यांच्याबाबत पाटील काय म्हणाले?

जावयाने गुन्हा गेला असेल तर चौकशी झाली पाहिजे. त्यांना कोणत्या बेसिसवर अटक करण्यात आली ही अद्याप माहिती नाही. या कामात सरकारी हस्तक्षेप झालेला नाही. नवाब मलिक यांचे जावई असूनही त्यांना अटक झालेली आहे. तपास यंत्रणा योग्य ते काम करेल. पण सरकारी हस्तक्षेप होण्याचा प्रश्न नाही. कोणाचे तरीही जावई आहेत म्हणून सासऱ्यांनी राजीनामा द्यावा असं मला वाटत नाही. जावयाची फॅमिली वेगळी आहे. त्याने जर गुन्हा केला असेल तर योग्य ती कारवाई होईल.

धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप

सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget